मुंबई : नेहा भसीन ही कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे आपल्या जबरदस्त गाण्यांनी तिने एक खास फॅन फाॅलोइंग तयार केलीये. नेहा भसीन (Neha Bhasin) ही सोशल मीडियावरही सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करताना नेहा भसीन ही दिसते. बिग बाॅस 15 (Bigg Boss 15) मध्येही नेहा भसीन ही सहभागी झाली होती. शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिची बहीण शमिता शेट्टी हिची खूप चांगली मैत्रिण ही नेहा भसीन असून शमिताच्या सपोर्टमध्ये कायमच ती मैदानात असते. नेहा भसीन ही फक्त तिच्या गाण्यांमुळेच नाहीतर तिच्या बोल्ड लूकमुळेही ओळखली जाते.
नुकताच सोशल मीडियावर नेहा भसीन हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. विशेष म्हणजे नेहा भसीन हिचा हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. पापाराझीला पोझ देताना देखील नेहा भसीन ही व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र, नेहा भसीन हिचे कपडे पाहून चाहते देखील हैराण झाल्याचे दिसत आहे.
नेहा भसीन हिने व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ऑफ शोल्डर क्रॉप ट्रॉप घातले आहे. मात्र, नेहा भसीन हिचा हा लूक बघितल्यानंतर अनेकांना थेट उर्फी जावेद हिचीच आठवण आलीये. इतकेच नाहीतर अनेकांनी हा व्हिडीओ पाहून नेहा भसीन ही उर्फी जावेद हिची बहीण असल्याचेच थेट म्हणून टाकले आहे.
नेहा भसीन हिच्या व्हिडीओवर कमेंट करत काही युजर्सने थेट स्वस्त लेडी गागा नेहा भसीन हिला म्हणून टाकले. आता सोशल मीडियावर नेहा भसीन ही जोरदार ट्रोल होताना दिसत आहे. एकाने नेहा भसीन हिच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, उर्फी जावेद फालतूमध्ये बदनाम होते…बघा हिचे कपडे
दुसऱ्याने लिहिले की, उर्फी जावेद हिची बहीण…नेहा भसीन ही टेरेंस लूइस याच्या पार्टीमध्ये पोहचली होती. आता याचेच व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. शमिता शेट्टी हिच्या वाढदिवसाच्या पार्टीला देखील नेहा भसीन बोल्ड लूकमध्ये काही दिवसांपूर्वी पोहचली होती. अनेका बोल्ड लूकमध्ये फोटोही नेहमी भसीन ही सोशल मीडियावर शेअर करते.
याच पार्टीमधील मलायका अरोरा हिचा देखील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. टेरेन्स लुईस याच्या पार्टीमध्ये मलायका अरोरा हिचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा ही रागात देखील दिसतंय. नेहा भसीन हिचा बोल्ड लूक आणि मलायका अरोरा हिचा राग यामुळे टेरेन्स लुईस याची पार्टी चर्चेत आलीये.