मुंबई : ‘शेरनी’ (Sherni) या चित्रपटातीन अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं ट्रेलर रिलीज झालं असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. शिवाय हा विद्या बालनचा वेगळ्या धाटणीचा नाट्यमय सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी अमेझॉन प्राइम व्हिडीओनं ‘मैं शेरनी’ हे दमदार गाणे प्रदर्शित केले आहे.
शेरनींच्या साहसाला या गाण्याच्या माध्यमातून सलाम
या गाण्यात विद्या बालनसह काही अनोख्या व्यक्तिमत्त्वाच्या स्त्रिया आहेत. तगून राहण्याच्या जिद्दीची यशोगाथा मांडणारं हे खास गाणं अकासा आणि रफ्तार यांनी गायलं आहे. पारंपरिक समजुतींना मोडीत काढत सर्व आव्हानांविरोधात ठामपणे उभे राहत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या या शेरनींच्या साहसाला या गाण्यातून सलाम करण्यात आला आहे.
गाण्याच्या माध्यमातून महिलांना सलामी
या म्युझिक व्हिडीओमध्ये F4 रेसर आणि ड्रायव्हर कोच मिरा एर्डा , बॉडी पॉझिटिव्हिटी इन्फ्ल्युएन्सर आणि योगा ट्रेनर नताशा नोएल , सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आणि हुला-हूप डान्सर एश्ना कुट्टी आणि कर्नाटकातील पहिली ट्रान्सजेंडर डॉक्टर त्रिनेत्रा हलदार , बी.वाय.एल नायर हॉस्पिटलमधील आघाडीची लढवय्यी जयश्री माने, आघाडीच्या लढवय्यांना जेवण पुरवणारी विद्यार्थिनी रिद्धी आर्या, सुरक्षा रक्षक अनिता देवी, शिक्षिका सीमा दुग्गल, घरकाम करणाऱ्या अर्चना जाधव यांच्यासोबत विद्या बालन दिसणार आहे. राघव यांनी लिहिलेलं ‘मैं शेरनी’ या गाण्याला उत्कर्ष धोतेकर यांनी संगीत दिलं आहे.
पाहा गाणं
अभिनेत्री विद्या बालनची प्रतिक्रिया
अभिनेत्री विद्या बालन म्हणाली, ‘कधीही हार न मानण्याची अमर्याद जिद्द बाळगणाऱ्या जगभरातील महिलांना आम्ही दिलेली सलामी म्हणजे ‘मैं शेरनी’ हा म्युझिक व्हिडीओ. शेरनी आम्हा सर्वांसाठी फार खास आहे आणि हा सिनेमा आणि म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून आम्ही अशा महिलांना वंदन करतो ज्यांनी दाखवून दिले की महिला करू शकणार नाहीत असं काहीच नसतं. या सिनेमातील माझी व्यक्तिरेखा विद्या विन्सेट… यातून आम्हाला दाखवायचं आहे की स्त्री निर्भय असते, ताकदवान असते. वाघीण असण्यासाठी डरकाळीच फोडायला हवी, असं नाही. अँथम बनलेल्या या गाण्यातून आम्ही हेच दाखवू पाहतोय.’
भारत आणि 240 हून अधिक देश आणि प्रांतातील प्राइम सदस्यांना 18 जून पासून फक्त अमेझॉन प्राइम व्हिडीओवर शेरनी हा चित्रपट बघता येईल.
संबंधित बातम्या