मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जॅकलीन फर्नांडिस हिच्यावर नोरा फतेही हिने काही दिवसांपूर्वीच अत्यंत गंभीर आरोप हे केले आहेत. सुकेश चंद्रशेखर याच्या प्रकरणात माझा काहीच संबंध नसताना मला त्यामध्ये फसवूण माझी बदनामी केली जात असल्याचे नोरा फतेही हिने म्हटले. इतकेच नाहीतर तिने जॅकलीन फर्नांडिस हिच्यावर मानहाणीचा दावा देखील दाखल केला. गेल्या काही दिवसांपासून सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलीन फर्नांडिससोबतच नोरा फतेहीवर देखील गंभीर आरोप केले जात होते.
काही दिवसांपूर्वी फीफा विश्वचषक 2022 मध्ये भारताचा तिरंगा एखाद्या रूमालासारखा पकडल्यामुळे सोशल मीडियावर अनेकजण नोरावर टिका करत होते. इतकेच नाहीतर नोरावर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली.
आता परत एकदा फीफा विश्वचषक 2022 च्या समारोप समारंभामध्ये नोरा फतेही ही तिच्या टिमसोबत परफॉर्मेंस करताना दिसणार आहे. यामुळे सर्वांच्या नजरा या फीफा विश्व कप 2022 च्या समारोप समारंभाकडे लागल्या आहेत.
फक्त नोरा फतेहीच नाहीतर जगभरातील अनेक प्रसिध्द डान्सर देखील परफॉर्मेंस देताना दिसणार आहे. उद्या 18 डिसेंबरला फीफा विश्वचषक 2022 चा समारोप समारंभ पार पडणार आहे.
भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता या समारंभाला सुरूवात होणार आहे. फ्रान्स आणि अर्जेंटिनामध्ये फायनल होणार आहे. परंतू या सामन्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत.