Nykaa IPO | ‘नायका’च्या शेअर्सची उत्तुंग भरारी, आलिया भट्ट आणि कतरिना कैफ झाल्या मालामाल!

| Updated on: Nov 12, 2021 | 11:34 AM

भारतीय शेअर बाजारात बुधवारी नायका (Nykaa) ही कंपनी सूचिबद्ध झाली. काही दिवसांपूर्वीच नायकाचा आयपीओ बाजारपेठेत आला. या आयपीओला गुंतवणूकदारांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. भांडवली बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतर नायकाच्या समभागाने 2018 रुपयांची पातळी गाठली.

Nykaa IPO | ‘नायका’च्या शेअर्सची उत्तुंग भरारी, आलिया भट्ट आणि कतरिना कैफ झाल्या मालामाल!
Katrina Kaif-Alia Bhatt
Follow us on

मुंबई : भारतीय शेअर बाजारात बुधवारी नायका (Nykaa) ही कंपनी सूचिबद्ध झाली. काही दिवसांपूर्वीच नायकाचा आयपीओ बाजारपेठेत आला. या आयपीओला गुंतवणूकदारांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. भांडवली बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतर नायकाच्या समभागाने 2018 रुपयांची पातळी गाठली. त्यामुळे आज बाजारपेठेत नायकाचा चांगलाच बोलबाला राहिला.

बॉलिवूडची ग्लॅमर गर्ल कतरिना कैफने गेल्या वर्षी तिचे भांडवल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Nykaa वर गुंतवले होते. तिने Nykaa च्या सहकार्याने तिचा मेकअप ब्रँड ‘Kay Beauty’ लॉन्च केला. कतरिना कैफने एका निवेदनात म्हटले आहे की, कंपनीच्या वाढत्या ब्रँड इक्विटी आणि मार्केट लीडरशिपची मला जाणीव आहे आणि त्यात गुंतवणूक करणे हे माझे पुढचे पाऊल आहे. ‘के ब्युटी’मध्ये कतरिनाने मेकअपचे जवळपास 64 आयटम लॉन्च केले.

अभिनेत्रींनी दाखवला विश्वास

कतरिना कैफसाठी, तिची गुंतवणूक एका वर्षात फळाला आली. ब्रँडच्या यशस्वी वाढीनंतर, अभिनेत्रीनेही पुढे जाऊन ई-कॉमर्स कंपनीमध्ये स्टेक खरेदी करून पैसे गुंतवले होते. 2018 मध्ये, कतरिना कैफने 2.02 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. दुसरीकडे, आलिया भट्टने थोडा अधिक विश्वास दाखवत जुलै 2020 मध्ये 4.95 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. आता ब्रँडच्या IPO ला प्रचंड यश मिळाले, ज्यामुळे त्यांच्या शेअर्समध्ये 10 पट वाढ झाली आणि अभिनेत्रींनाही मोठा फायदा झाला आहे.

किती फायदा झाला?

अर्थात प्रारंभिक गुंतवणूकीतून कतरिना कैफला 22 कोटी, आलिया भट्टला तिच्या 4.95 कोटी गुंतवणूकीच्या बदल्यात तब्बल रुपये 54 कोटी मिळाले आहेत. विशेष म्हणजे एखाद्या सेलिब्रेटीने कंपनीच्या IPO मधून कमाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी अमिताभ बच्चन यांनी जस्टडायलवरही मोठी बाजी लावली होती. 2013 मध्ये, त्यांच्या IPO नंतर, JustDial ने बच्चन यांना त्यांच्या गुंतवणुकीच्या रकमेत 46 पट वाढ दिली होती.

अल्पावधीत लोकप्रिय झाला ब्रँड

Nykaa सध्या 400 ब्रँडची उत्पादने विकते. त्याच्या वेबसाइटवर 40,000 हून अधिक उत्पादने आहेत. Nykaa चा दावा आहे की त्यांच्याकडे 5 दशलक्ष सक्रिय मासिक वापरकर्ते आहेत आणि दरमहा 150 कोटी ऑर्डर हाताळतात. कंपनीच्या वेबसाइट, अॅप आणि स्टोअरवर 1500 ब्रँडची 1.3 लाखाहून अधिक उत्पादने उपलब्ध आहेत.

त्यामुळे नायका हा ब्रँड अल्पावधीत लोकप्रिय झाला. नायकाच्या संकेतस्थळावर मेबेलाईन, लॅक्मे, लॉरेल, MAC, Huda Beauty आणि Estee Lauder यासारख्या 300 हून अधिक ब्रँडसची उत्पादने उपलब्ध आहेत. सौदर्यंप्रसाधने आणि लिपस्टीकच्या असंख्य शेडसमुळे नायका ही आघाडीची ऑनलाईन रिटेलर कंपनी म्हणून नावारुपाला आली. 2020-21 या आर्थिक वर्षात ‘नायका’च्या उत्पादनविक्रीत 35 टक्क्यांनी वाढ झाली. हा आकडा जवळपास 33 कोटी डॉलर्स इतका होता.

हेही वाचा :

Govinda Naam Mera | कतरिनासोबत लग्नाची तयारी, दुसरीकडे विकीचा फोटो शेअर करत कियारा म्हणतेय ‘आजकाल चर्चा आमच्या प्रेमाची…!’

100 कोटींचा गल्ला जमवणारे बॉलिवूड ‘सुपरस्टार’ कधी काळी ठरलेयत ‘सर्वाधिक फ्लॉप’ देणारे कलाकार!