मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पठाण या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर पठाण चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. शाहरुख खान याचा हा चित्रपट 25 जानेवारी रोजी रिलीज झालाय. पठाण (Pathaan) चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल 32 दिवस झाले असूनही बाॅक्स ऑफिसवर पठाण चित्रपटाची जादू कायमच आहे. विशेष म्हणजे पठाण चित्रपटामुळे अक्षय कुमार याच्या सेल्फी आणि कार्तिक आर्यन याच्या शहजादाला मोठा फटका बसला आहे. कारण चाहत्यांमध्ये अजूनही पठाण चित्रपटाबद्दल क्रेझ बघायला मिळत आहे. सेल्फी आणि शहजादा हे दोन्ही चित्रपट धमाका करू शकले नाहीयेत.
विशेष म्हणजे पठाण चित्रपटाची 32 व्या दिवशीही बाॅक्स ऑफिसवर हवा बघायला मिळतंय. पठाण चित्रपटाचे 32 व्या दिवशी 2 कोटीचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. अक्षय कुमार याच्या सेल्फी चित्रपटाने ओपनिंग डेला 3 कोटीचे कलेक्शन केले. पठाण चित्रपटाने ओपनिंग डेला 100 कोटीचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन जगभरातून केले.
मुळात म्हणजे शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वाद निर्माण झाला होता. अनेकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची थेट मागणी केली होती. मात्र, या वादाचा फायदा चित्रपटाला झाल्याचे दिसत आहे.
पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने चार वर्षांनंतर पदार्पण केल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये सुरूवातीपासूनच या चित्रपटाबद्दल क्रेझ बघायला मिळत होती. विशेष म्हणजे शाहरुख खान हा या चित्रपटाचे प्रमोशन वगैरे करताना अजिबात दिसला नाही. पठाण चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत.
पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होता. या चित्रपटाने ओपनिंग डेलाही धमाका केला. विशेष म्हणजे पठाण चित्रपटाला फक्त भारतामध्येच नाहीतर विदेशातही खूप प्रेम मिळाले. शाहरुख खान याच्या करिअरमधील पठाण हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने बाहुबली 2 चा रेकाॅर्ड देखील आपल्या नावावर नोंदवला. सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा चित्रपट ठरला आहे. पठाण चित्रपटाची जबरदस्त अशी कमाई सुरू असतानाच शाहरुख खान याने त्याच्या आगामी जवान या चित्रपटाच्या शुटिंगलाही सुरूवात केलीये. यावर्षीच शाहरुख खान याचा डंकी हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.