आज फादर्स डे (Fathers Day) आहे. प्रत्येकजण आपआपल्यापरीने हा दिवस साजरा करतोय. फादर्स डेनिमित्त मुल वडिलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात. सोशल मीडियावर अनेकांनी स्पेशल पोस्ट्स शेअर केल्या आहेत. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीही फादर्स डे साजरा करण्यात मागे नाहीत. प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त (Sanjay dutt) यानेसुद्धा वडील सुनील दत्त (Sunil Dutt) यांच्यासाठी सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट लिहिली आहे. संजय दत्तने करियरमध्ये अनेक चढ-उतार अनुभवले. बॉम्बस्फोट खटल्याचे दिवस तो कधीच विसरु शकणार नाहीत. या कठीण काळात त्याचे पिता सुनील दत्त एका खडकासारखे भक्कमपणे त्याच्यामागे उभे राहिलेत. त्याला आधार दिला. त्यामुळे आज फादर्स डेच्या निमित्ताने संजय त्यांचं स्मरण करताना भावूक झाला.
संजय दत्तनेसुद्धा वडील सुनील दत्त आणि तिन्ही मुलांसह कोलाज फोटो शेअर करुन आजचा दिवस संस्मरणीय बनवला. “आय लव्ह यू डॅड, प्रत्येक छोटी गोष्ट जी तुम्ही माझ्यासाठी, कुटुंबासाठी केली त्याबद्दल Thank you. तुम्ही नेहमीच माझी ताकद, अभिमान आणि प्रेरणेचा स्त्रोत राहाल. मी तुमच्यासारख्या बेस्ट रोल मॉडेलचा मुलगा आहे, हे माझं नशीब आहे. मी भाग्यवान आहे. मला तुमच्यासारख पालक बनायचं आहे. सर्वच पित्यांना फादर्स डे च्या शुभेच्छा” असं संजय दत्तने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री सारा आली खानने वडील सैफ अली खान आणि भाऊ इब्राहिम अली खानसोबत एक फोटो शेअर केलाय. फॅमिली लंच डेट आउटिंगचा हा फोटो आहे. साराने वडील सैफ अली खान यांना फादर्स डेच्या शुभेच्छा देताना ‘हॅप्पी फादर्स डे अब्बा जान’ असा मेसेज लिहिलाय. वडील आणि भावासोबतचा साराचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच भावला आहे. तासाभरातच या फोटोला लाखो लाईक्स मिळाले आहेत. साराच्या या फोटोआधी तिचे लंच आउटिंगचे आणखी सुद्धा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आपल्या दोन्ही मुलांसोबत सैफने लक्षात राहील, असा फादर्स डे साजरा केला.
साराशिवाय करीना कपूर खान, श्वेता बच्चन नंदा, अजय देवगण, माधुरी दीक्षितसह अन्य सेलिब्रिटींनी सुद्धा फादर्स डे साठी खास पोस्ट केल्या आहेत. करीना कपूरने वडिल रणधीर कपूर यांच्यासोबत फोटो पोस्ट करुन त्यांना विश केलं आहे.