मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणची (Ajay Devgn) पत्नी आणि सुंदर अभिनेत्री काजोल (Kajol) आज (5 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. काजोलने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी ख़ुशी कभी गम’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘बाजीगर’, ‘दिलवाले’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. काजोलने तिच्या कारकिर्दीत अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्यासोबत अनेक चित्रपटांत काम केले. मात्र, एक वेळ अशीही होती जेव्हा शाहरुख तिला एक वाईट अभिनेत्री मानायचा.
एका चित्रपटादरम्यान शाहरुखने आमिरला ‘काजोल चांगली अभिनेत्री नाही, तिला चित्रपटात घेऊ नकोस’, असे सांगितले होते. एका मुलाखती दरम्यान शाहरुख खानने स्वतः हा किस्सा सांगितला होता.
शाहरुख त्याच्या एका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, तो आणि काजोल बाजीगर या चित्रपटात एकत्र काम करत होते. या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान आमीर खानने शाहरुखकडे काजोलला आपल्या नवीन चित्रपटात कास्ट करण्याविषयी विचारणा केली होती. तेव्हा शाहरुखने त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला आणि म्हणाला की, काजोलला चित्रपटात घेऊ नकोस, ती चांगली अभिनेत्री नाही. ती कामावर लक्ष देत नाही. तू तिच्यासोबत काम करू शकणार नाहीस.
मात्र, काजोलसोबत काम केल्यानंतर आणि चित्रपट हिट झाल्यानंतर शाहरुखचे काजोलबद्दलचे विचार बदलले. त्यानंतर त्याने स्वतः आमिर खानला फोन केला आणि काजोलची स्तुती केली. आधी बोललेल्या गोष्टी चुकीच्या आणि आणि काजोलची जादू पडद्यावर दिसते, असं शाहरुख म्हणाला.
इतकेच नाही तर, एका मुलाखती दरम्यान शाहरुख म्हणाल होता की, काजोल एक अतिशय चांगली अभिनेत्री आहे. माझ्या मुलीने, सुहानाने तिच्याकडून अभिनयाचे धडे घेतले पाहिजेत. सुहानालाही अभिनेत्री होण्याची इच्छा आहे.
काजोलची शाहरुखसोबत अशी काही जोडी बनली आहे, की जी प्रत्येकाला आवडते. चाहत्यांना हे दोन स्टार एकत्र बघायला आवडतात. या जोडीने बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये उत्कृष्ट काम केले आहे. ‘बाजीगर’पासून ते ‘करण अर्जुन’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘माय नेम इज खान’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आहे.
शाहरुख खान ते अक्षय कुमारपर्यंत, बॉलिवूडकरांनी भारतीय हॉकी संघावर केला शुभेच्छांचा वर्षाव!
अवघ्या 16व्या वर्षी मोठ्या पडद्यावर एंट्री, शाहरुखसोबत जमली जोडी!