अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाल्याचं कळतंय. पापाराझींनी क्लिक केलेले काही व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये काही पाहुणे रणबीर-आलियाच्या घरी जाताना पहायला मिळत आहेत. लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांचे आणि लग्नाचे फोटो लीक होऊ नये यासाठी सुरक्षारक्षकांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. रणबीरच्या घराबाहेरील सिक्युरिटी गार्डने यासाठी एक युक्ती अंमलात आणली आहे. कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्यांच्या मोबाइल फोनच्या कॅमेरावर तो स्टिकर लावताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Ranbir Alia Wedding)
रणबीर आणि आलियाच्या घरांना रोषणाई करण्यात आली आहे. या दोघांच्याही घराबाहेर कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. नुकतंच नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर ऋषी कपूर यांच्यासोबतचा त्यांच्या साखरपुड्याचा फोटो पोस्ट केला. ‘बैसाखीच्या आठवणी’ असं कॅप्शन देत त्यांनी हा फोटो पोस्ट केला. 13 एप्रिल 1979 रोजी ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा साखरपुडा पार पडला होता. त्यामुळे याच तारखेपासून रणबीर-आलियाच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जातंय.
रणबीरची बहीण रिधिमा कपूर पती भारत सहानी आणि मुलगी समारासोबत मंगळवारी मुंबईत दाखल झाली. तर दुसरीकडे आलियाची आई सोनी राझदान यांच्या खास मैत्रिणीने लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आमची सोनी आता सासू होणार आहे. महेश भट्ट आणि सोनी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. रणबीर आणि आलियाला माझा आशीर्वाद’, असं त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे.
“रणबीर-आलियाच्या लग्नात सुरक्षेची जबाबदारी युसुफ भाईने उचलली आहे. त्याच्याकडे 9/11 एजन्सी हे मुंबईतील सर्वोत्तम सुरक्षा दल आहे. या एजन्सीमधून सुमारे 200 बाऊन्सर्स बोलावण्यात आले आहेत. माझ्या टीममधील 10 मुलांनाही पाठवलं जाईल”, अशी माहिती आलियाच्या सावत्र भावाने दिली. कृष्ण राज बंगला आणि आर. के. स्टुडिओलाही रोषणाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावर या रोषणाईचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा:
गायिका नेहा भसिनच्या भावाने युक्रेनियन गर्लफ्रेंडशी केलं लग्न; युद्धामुळे तिने सोडला देश
“बॉलिवूड चित्रपट दक्षिणेत का चालत नाही?”; सलमानच्या प्रश्नाचं रामचरणने दिलं उत्तर