मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झालाय. सलमान खान याच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही सुरूवातीपासूनच बघायला मिळत होती. मात्र, चित्रपट (Movie) रिलीज झाल्यावर फार काही धमाका करण्यात चित्रपटाला यश मिळाले नाही. सलमान खान याचे चाहते किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. सलमान खान याची एक झलक ही शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटात बघायला मिळाली होती. पठाण अडचणीत असताना सलमान खान हा त्याच्या मदतीसाठी धावून गेल्याचे चित्रपटात दाखवण्यात आले.
सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या माध्यमातून श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिने बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पलक तिवारी हिच्या अभिनयाचे फार काही काैतुक करण्यात नाही आले. सलमान खान याच्यासह चित्रपटाची संपूर्ण टिम जोरदार प्रमोशन करताना दिसली. सलमान खान हा कपिल शर्मा याच्या देखील शोमध्ये प्रमोशन करण्यासाठी गेला होता.
किसी का भाई किसी की जान या चित्रपटानंतर पलक तिवारी ही जोरदार चर्चेत आहे. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर पलक हिने एका मुलाखतीदरम्यान अत्यंत मोठा खुलासा करत म्हटले होते की, सलमान खान याच्या चित्रपटाच्या सेटवर मुलींनी कशाप्रकारचे कपडे घालायचे यावर नियम तयार करून दिले होते. मुलींना शाॅर्ट कपडे घालण्याची परवानगी नव्हती.
पलक तिवारी हिचा हा खुलासा ऐकून सर्वांना धक्का बसला. यावर अनेक चर्चा देखील रंगल्या. आता नुकताच पलक तिवारी हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये पलक तिवारी हिने थेट माफी देखील मागितलीये. पलक तिवारी म्हणाली की, गैरसमज हा आमच्या कामाचा एक मोठा भाग नक्कीच आहे. मला आणि सलमान सरांना यामुळे काहीच आश्चर्य नक्कीच नाही वाटले.
सलमान सर हे खूप जास्त समजदार आहेत. मी कधीच त्यांच्याबद्दल वाईट किंवा चुकीचे बोलणार नाही हे त्यांना देखील माहिती आहे. हा पण माझ्याकडून चूक झाली, मी शिकेन आणि ही गोष्ट मी माझ्या आयुष्यात नेहमीच लक्षात ठेवले. थोडक्यात काय तर पलक तिवारी हिने आपली चूक ही कबुल केलीये. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, पलक तिवारी ही सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान याला डेट करत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी यावर पलक हिने स्पष्टीकरण दिले आहे.