मुंबई : गेल्या काही दिवसांपासून टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) ही प्रचंड चर्चेत आहे. पलक चर्चेत असण्याचे तेवढे खास कारण देखील आहे. कारण पलक तिवारी चक्क सलमान खान (Salman Khan) याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटात दिसणार आहे. श्वेता तिवारी हिने पलक तिवारी हिच्या बाॅलिवूड पदार्पणासाठी खूप जास्त मेहनत घेतलीये. सतत काही वर्ष मुलगी पलक हिला घेऊन श्वेता तिवारी चित्रपट निर्मात्यांकडे जात होती आणि शेवटी सलमान खान याने श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिच्या मुलीला बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी दिलीये.
किसी का भाई किसी की जान या चित्रपटात पलक तिवारी ही महत्वाच्या भूमिकेत आहे. फक्त चित्रपटामुळेच नाही तर पलक ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही प्रचंड चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान याच्यासोबत पलक तिवारी हिचे नाव जोडले जात आहे. इतकेच नाहीतर हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.
नुकताच पलक तिवारी हिने एक मुलाखत दिलीये आणि आपल्या आणि इब्राहिम अली खानच्या रिलेशनवर मोठे भाष्य केले आहे. पलक तिवारी म्हणाली की, मी आणि इब्राहिम अली खान खूप जास्त मित्र नाहीत, जेवढे लोकांना वाटते तेवढे तर नक्कीच नाहीत. आम्ही नेहमीच कार्यक्रमांमध्ये भेटतो आणि तिथेच जास्त गप्पा मारतो.
मी आणि इब्राहिम अली खान कधीच खाजगीमध्ये भेटलो नाहीत. इब्राहिम अली खान याला माहिती आहे की, मी सलमान खान याच्यासोबत चित्रपट करत आहे. मात्र, त्याने त्यावर काहीच भाष्य केले नाही. आम्ही एकमेकांना बोलतो हे खरे आहे पण आम्ही जास्त क्लोज नक्कीच नाहीत. धक्कादायक म्हणजे यावेळी पलक तिवारी ही चक्क आर्यन खान याच्याबद्दल बोलताना दिसली.
शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्याबद्दल श्वेता तिवारी हिच्या मुलीने अत्यंत मोठे भाष्य केले. पलक तिवारी म्हणाली की, आर्यन खान याची रिअल पर्सनालिटी लोकांना जाणून घ्यायला आवडते. आर्यन खान जसा दिसतो आणि जसा राहतो तिच त्याची रिअल पर्सनालिटी आहे. आर्यन खान हा खूप जास्त स्वीट आहे. पार्टीमध्ये तो सर्वांसोबत खूप जास्त छान वागतो. आर्यन खान हा अत्यंत शांत स्वभावाचा आहे. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन आर्यन एकसारखा वागतो.