मुंबई : श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी (Palak Tiwari) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. पलक आपल्या चाहत्यांसाठी कायमच बोल्ड आणि हाॅट फोटो शेअर करते. बिकिनीवर तर कायमच पलक फोटो शेअर करते. अत्यंत कमी वेळामध्ये पलकच्या फॅन फाॅलोइंगमध्येही मोठी वाढ झालीये. पलक लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पलक हिच्या बाॅलिवू़ड पदार्पणासाठी आई श्वेता तिवारी हिने खूप जास्त मेहनत घेतली आहे. शेवटी २०२३ मध्ये पलक बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये धमाका करणार आहे. पलकची आई श्वेता तिवारी हिने अनेक हीट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
नुकताच पलक तिवारी हिने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. मात्र, पलकचा हा फोटो पाहून अनेकांना आता उर्फी जावेदची आठवण आलीये. अनेकांनी पलकच्या फोटोला ट्रोल करण्यासही सुरूवात केलीये.
पलकने जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये शर्ट दिसत नसून तिने हटके पोज दिलीये. या फोटोमध्ये पलक तिवारी हिने केस मोकळे सोडले असून सिल्वर नेकपीस घातला आहे. हा फोटो आता व्हायरल होतोय.
पलक तिवारीचा हा फोटो पाहून अनेकांना उर्फी जावेद हिची आठवण आली आहे. एका युजर्सने कमेंट करत लिहिले, प्रत्येकाला फेमस होण्यासाठी उर्फी जावेद का व्हावे वाटत आहे? अनेकांनी या फोटोवर दुसरी उर्फी जावेद म्हटले.
पलक तिवारी हिच्याकडे सध्या रोमियो एस 3 हा चित्रपट असून या चित्रपटामध्ये पलक ही महत्वाच्या भूमिकेत असणार आहे. पलक तिवारी हिच्याकडे दुसऱ्याही चित्रपटाच्या काही आॅफर असल्याचे सांगितले जातंय.
पलक तिवारी हिची आई श्वेता तिवारी हिने देखील काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो शेअर केले होते. श्वेता तिवारी 42 वयाची असूनही अत्यंत बोल्ड आहे.