सावत्र वडिलही पलक तिवारीचे काैतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाही, चक्क अभिनव कोहलीचा हा मोठा दावा

| Updated on: Apr 22, 2023 | 2:35 PM

किसी का भाई किसी की जान हा सलमान खान याचा बहुचर्चित चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या चित्रपटाची चाहते गेल्या कित्येक वर्षांपासून वाट पाहताना दिसत होते. शेवटी हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटात पूजा हेगडे आणि सलमान खान हे मुख्य भूमिकेत आहेत.

सावत्र वडिलही पलक तिवारीचे काैतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाही, चक्क अभिनव कोहलीचा हा मोठा दावा
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट नुकताच चाहत्यांच्या भेटीलाय आलाय. या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा नक्कीच आहेत. मात्र, ओपनिंग डेला काही खास धमाका करण्यात चित्रपटाला यश मिळाले नाहीये. विकेंडचा फायदा चित्रपटाला होईल, असा एक अंदाज बांधला जातोय. सलमान खान (Salman Khan) याच्यासोबत या चित्रपटामध्ये श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) ही देखील आहे. पलक तिवारी आणि शहनाज गिल यांनी किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पूजा हेगडे आणि सलमान खान हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

किसी का भाई किसी की जान या चित्रपटाने 15.81 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले आहे. शनिवार आणि रविवार चित्रपटाला फायदा होणार असल्याचे सांगितले जातंय. किसी का भाई किसी की जान या चित्रपटामधील पलक तिवारी हिचा अभिनय लोकांना खास आवडला नाहीये. शहनाज गिल हिचे अभिनयासाठी काैतुक केले जात आहे.

किसी का भाई किसी की जान हा सलमान खान याचा बहुचर्चित चर्चेत आहे. पलक तिवारी हिचा अभिनय कोणाला आवडू किंवा नाही, परंतू पलक तिवारी हिच्या सावत्र वडिलांनी पलक तिवारी हिच्या अभिनयाचे काैतुक केले आहे. इचकेच नाही तर ते थेट चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीपेक्षाही सुंदर दिसत असल्याचे त्यांनी पलक तिवारी हिला म्हटले आहे.

पलक तिवारी हिच्या वडिलांचे नाव राजा चौधरी आहे. मात्र, राजा चौधरीसोबत श्वेता तिवारी हिने घटस्फोट घेतल्यानंतर तिने अभिनव कोहलीसोबत लग्न केले. अभिनय कोहलीनेच श्वेता तिवारी हिच्या अभिनयाचे काैतुक केले आहे. अभिनय कोहली पलक तिवारी हिचे सावत्र वडील आहेत. अभिनव कोहली याच्यापासून श्वेता तिवारी ही 2019 मध्ये विभक्त झालीये. पलक तिवारी हिला अभिनव कोहली याने मारल्यानेच श्वेता त्याच्यापासून विभक्त झाल्याचे सांगितले जाते.

किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून पलक तिवारी ही चर्चेत आहे. पलक तिवारी ही सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान याचा डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पलक तिवारी ही आर्यन खान याच्याबद्दल सांगताना दिसली होती.