मुंबई : द स्टोरी टेलर या चित्रपटामुळे परेश रावल सध्या चर्चेत आहेत. या चित्रपटामध्ये एका महत्वाच्या भूमिकेत परेश रावल असणार आहेत. अनेक वर्षांपासून चित्रपटामध्ये धमाकेदार भूमिका करत परेश रावल यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी बंगाली लोकांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर त्यांना रोषाचा सामना करावा लागला होता. आपली चुक लक्षात येताच परेश रावल यांनी जाहिरपणे माफी देखील मागून टाकली होती. गुजरातमध्ये प्रचार करताना त्यांनी बंगाली लोकांबद्दल वादग्रस्त विधान केले होते.
वादग्रस्त विधानानंतर जाहिरपणे परेश रावल यांनी त्याचवेळी लोकांची माफी मागितली होती. परंतू अनेकांनी परेश रावल यांच्या त्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला होता. यावर आता परेश रावल यांनी मोठे स्पष्टीकरण दिले आहे.
परेश रावल यांनी बंगाली लोकांबद्दल ते विधान करून आता महिना उलटून गेला आहे. यावर नुकताच परेश म्हणाले, मी जे काही बोललो होतो, त्यावेळी बोलताना माझी जीभ घसरली आणि लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला.
कोणालाच दुखवण्याचा माझा हेतू अजिबातच नव्हता. मात्र, मला एका गोष्टीचे दु:ख होते की, मी ज्या बंगाली लोकांचे चित्रपट आणि कला पाहतो…त्यांनीही माझ्याबद्दल गैरसमज करू घेतला…
गुजरात निवडणुकीच्या प्रचारात परेश रावल यांनी महागडे गॅस सिलिंडर बंगाली लोकांशी जोडत एक वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळी परेश रावल यांच्याविरोधात FIR देखील दाखल करण्यात आली होती.
आपण केलेल्या वक्तव्यावरून वाढलेला वाद पाहात, त्याचवेळी परेश रावल यांनी माफी मागितली होती. बंगाली समुदाय आणि लोकांकडून जोरदार टीका ही परेश रावल यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली होती.