मुंबई : बाॅलिवूडचे बिग बी म्हणून आज अमिताभ बच्चन यांची ओळख आहे. आयुष्यामध्ये बिग बी यांनी खूप मोठा संघर्ष केला आहे. बाॅलिवूडमध्ये काम करत असताना एक काळ असा आला होती की, अमिताभ बच्चन यांच्यावर तब्बल 90 कोटींचे कर्ज झाले होते. ही माहिती अभिताभ बच्चन यांचे मित्र आणि अभिनेते परेश रावल यांनी दिलीये. नुकताच परेश रावल यांनी एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याविषयी सांगितले आहे.
अमिताभ बच्चन यांच्यावर 90 कोटी रुपयांचे कर्ज होते. यावर बोलताना परेश रावल म्हणाले की, या काळात अमिताभ बच्चन यांनी खूप सन्मानाने व्यवहार केले. 1999 मध्ये अमिताभ बच्चन यांची कंपनी अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मोठे नुकसान झाले होते.
कंपनीमध्ये मोठे नुकसान झाल्याने अमिताभ बच्चन यांच्यावर 90 कोटींचे कर्ज झाले. यादरम्यान त्यांना अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ देखील आली होती. काही काळानंतर त्यांना कौन बनेगा करोडपतीची आॅफर आली आणि दिवस काही वर्षांमध्ये बदलले. यादरम्यान त्यांचा चित्रपट मोहब्बते देखील हिट झाला.
पुढे परेश रावल म्हणाले की, कुणाला माहिती आहे का? अभिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये हा काळ देखील बघितला आहे. अमिताभ बच्चन काय होते आणि काय झाले, यासाठी हे उत्तम उदाहरण नक्कीच आहे. यावरून तुम्ही डिग्निटीबद्दल नक्कीच शिकू शकता.
अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटामध्ये तीन मित्रांची सुंदर अशी मैत्री दाखवण्यात आलीये. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर देखील चांगली कमाई केलीये. अनुपम खेर देखील या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत महत्वाच्या भूमिकेत होते.