मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी रिलीज झाला. हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने सोशल मीडियावर केली जात होती. पठाण (Pathaan) चित्रपटातील बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वाद सुरू होता. अनेकांनी थेट या चित्रपटावर बंदी घालण्याची थेट मागणी केली होती. मात्र, या वादाचा फायदा चित्रपटाला (Movie) प्रत्यक्षात झाल्याचे दिसून आले. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान अशी कामगिरी केलीये. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत.
विशेष म्हणजे पठाण हा चित्रपट शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने बाहुबलीचा रेकाॅर्ड देखील तोडलाय. पठाण चित्रपटाने ओपनिंग डेला 100 कोटींचे कमाई करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. या चित्रपटाने तूफान अशी कामगिरी नक्कीच केलीये.
मुळात म्हणजे पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर सतत फ्लाॅप जाताना दिसत होते. दुसरीकडे साऊथचे चित्रपट धमाका करत होते. यादरम्यान अनेकांनी बाॅलिवूडवर टिका करण्यास सुरूवात केली. विशेष म्हणजे शाहरुख खान हा पठाण चित्रपटाचे काही खास प्रमोशन करताना दिसला देखील नाही.
पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर शाहरुख खान हा फक्त चाहत्यांच्या संपर्कात सोशल मीडियाच्या माध्यमातून होता. सोशल मीडियावर तो एक सेशन चाहत्यांसाठी ठेवत होता आणि या सेशनमध्ये तो चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला. पठाण चित्रपटानंतर कार्तिक आर्यन याचा शहजादा आणि अक्षय कुमार याचा सेल्फी हे चित्रपट फ्लाॅप गेले. अक्षय कुमार याच्या सेल्फी चित्रपटाकडून चाहत्यांना प्रचंड अपेक्षा असताना हा चित्रपट फ्लाॅप गेला. एक मागून एक असे अक्षय कुमारचे पाच चित्रपट फ्लाॅप गेले आहेत.
आता बाॅक्स आॅफिसवर धमाका केल्यानंतर पठाण हा चित्रपट ओटीटीवर आपला जलवा दाखवण्यास तयार आहे. 22 मार्चला प्राइम व्हिडिओवर पठाण हा चित्रपट धमाका करेल. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे पठाणनंतर डंकी आणि जवान हे देखील चित्रपट शाहरुख खान याचे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 2023 हे वर्ष शाहरुख खान याच्यासाठी लकी ठरले आहे.