Shah Rukh Khan | पठाण चित्रपटाच्या ट्रेलरचा धमाका, 24 तासामध्येच थेट…

| Updated on: Jan 11, 2023 | 5:21 PM

कालच पठाण चित्रपटाचा ट्रेलर हा रिलीज करण्यात आलाय. यापूर्वी चित्रपटामधील दोन गाणे आणि टीझर रिलीज करण्यात आले होते.

Shah Rukh Khan | पठाण चित्रपटाच्या ट्रेलरचा धमाका, 24 तासामध्येच थेट...
Follow us on

मुंबई : शाहरुख खान पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचे चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून त्याच्या पदार्पणाची वाट पाहात आहेत. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट २५ जानेवारी रोजी चाहत्यांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा आहेत. मात्र, चित्रपटातील बेशर्म रंग गाणे रिलीज झाल्यापासून मोठा वाद सुरू आहे. दीपिकाने बेशर्म रंग या गाण्यामध्ये भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वादाला तोंड फुटले. कालच पठाण चित्रपटाचा ट्रेलर हा रिलीज करण्यात आलाय. यापूर्वी चित्रपटामधील दोन गाणे आणि टीझर रिलीज करण्यात आले होते.

पठाण चित्रपटाचा ट्रेलर धमाका करताना दिसत आहे. अनेकांना हा ट्रेलर प्रचंड आवडला असून चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढतच जात आहे. सोशल मीडियावर पठाणच्या ट्रेलरला चाहत्यांचे प्रेम मिळत आहे.

बेशर्म रंग गाणे रिलीज झाल्यापासून चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणीही सोशल मीडियावर सुरू आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून अजूनच ही मागणी जोर धरताना दिसत आहे.

पठाण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होऊन २४ तास होत असताना यूट्यूबवर ट्रेलरला जबरदस्त व्हूज मिळताना दिसत आहेत. २४ तासामध्ये पठाण चित्रपटाच्या ट्रेलरला 27 मिलियनपेक्षाही अधिक व्हूज मिळाले आहेत.

पठाण चित्रपटाच्या ट्रेलरला 1.5 मिलियनपेक्षा अधिक लाईक्स देखील मिळाले आहेत. यामुळेच पठाणचा ट्रेलर सुपरहिट ठरताना दिसतोय. शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम हे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत.

शाहरुख खानसह चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाचे खास प्रमोशन करताना दिसत आहे. शाहरुख खान हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय झाला असून चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे.

2023 हे वर्ष शाहरुख खान याच्यासाठी खास ठरणार आहे. कारण या वर्षामध्ये त्याचे तब्बल तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पठाणनंतर लगेचच त्याचा डंकी हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

पठाण चित्रपटातील दोन्ही गाणे हीट ठरली आहेत. बेशर्म रंग गाण्यावरून वाद झाला. मात्र, त्याचाही फायदा हा गाण्याला झाल्याचे दिसत आहे. बेशर्म रंग हे गाणे देखील हीट ठरले आहे.