मुंबई : शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटासंदर्भात एक अत्यंत मोठी बातमी पुढे येतंय. पठाण चित्रपटाचे टीझर आणि दोन गाणे यापूर्वीच रिलीज झाले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चाहते हे पठाण चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी आता ट्रेलर रिलीजची तारीख जाहिर करण्यात आलीये. विशेष म्हणजे हे ट्रेलर तब्बल दोन मिनिटांचे असल्याचे सांगण्यात येतंय. चाहत्यांची चित्रपटाबद्दलची आतुरता ट्रेलर बघितल्यावर अजून वाढण्याची शक्यता देखील आहे. पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यापासून मोठा वाद सुरू आहे.
पठाण चित्रपटातील दोन गाणे आणि टीझर काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. मात्र, अजूनही ट्रेलर रिलीज करण्यात आला नव्हता. बेशर्म रंग गाण्यावरून सुरू असलेल्या वादामुळे ट्रेलर उशीरा रिलीज होणार असल्याचे सांगितले जात होते.
पठाण हा चित्रपट 25 डिसेंबरला रिलीज होणार आहे. शाहरुख खान याचे चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान हा तब्बल 4 वर्षांनंतर बाॅलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे.
विशेष म्हणजे पठाणनंतर लगेचच शाहरुख खान याचा डंकी हा चित्रपट देखील चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. यामुळे वादाला तोंड फुटले.
सोशल मीडियावर पठाणमधील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यापासून चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जातंय. आता याचा फटका चित्रपटाला काय बसतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
पठाण चित्रपटाचा ट्रेलर हा 10 जानेवारीला रिलीज होतोय. म्हणजेच चाहत्यांना ट्रेलर बघण्यासाठी अजून सहा दिवस वाट पाहावी लागणार आहे. आता ट्रेलरमध्ये काय धमाका होतो हे 10 जानेवारीला कळेल.