Ahemdabad : सोसायटीच्या चेअरमनला जीवे मारण्याची धमकी, पायल रोहतगीला पोलिसांकडून अटक

| Updated on: Jun 25, 2021 | 3:13 PM

सोसायटीच्या अध्यक्षांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचा पायल रोहतगीवर आरोप आहे. सभापतींच्या तक्रारीनंतर पायलला अटक करण्यात आली आहे. (Payal Rohatgi arrested for threatening to kill society chairman)

Ahemdabad : सोसायटीच्या चेअरमनला जीवे मारण्याची धमकी, पायल रोहतगीला पोलिसांकडून अटक
Follow us on

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री पायल रोहतगीला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर सोसायटीच्या अध्यक्षांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. सभापतींच्या तक्रारीनंतर पायलला अटक करण्यात आली आहे. पायलनं 20 जून रोजी सोसायटीची सदस्य नसतानाही तिनी सोसायटीच्या मिटिंगमध्ये प्रवेश केला आणि पुढे तिनं भांडण केलं, शिवाय अध्यक्षांसह अनेकांना शिवीगाळ केली असाही तिच्यावर आरोप आहे.

मुलांनी सोसायटीमध्ये खेळू नये यासाठी तिनं वाद घातला. नेहमीच  आक्षेपार्ह भाष्य करणाऱ्या पायलला यापूर्वीही नेहरू गांधी परिवारावर भाष्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. ज्यामध्ये तिला नंतर जामीन मंजूर झाला. पायलनं अनेक दिवसांपासून सोसायटीच्या अध्यक्षांविरोधात वाद घातला होता. तिनं आपल्या इन्स्टाग्रामवर त्याच्याविरूद्ध एक व्हिडीओ देखील पोस्ट केला होता.

पाहा पोस्ट

 

कोण आहे पायल रोहतगी?

पायल रोहतगीनं 2002 मध्ये ‘ये क्या हो रहा है’ या चित्रपटाद्वारे करिअरची सुरूवात केली होती. नंतर तिला चित्रपटांमध्ये विशेष यश मिळू शकलं नाही. पायलनं कुस्तीपटू संग्राम सिंगसोबत लग्न केलं आहे. तिनं वीस हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि बिग बॉसपासून ते खतरों के खिलाडीपर्यंतच्या अनेक शोमध्येदेखील ती सहभागी झाली आहे.

पायल तिच्या सोशल मीडियावरील वक्तव्यांमुळे चर्चात असते. व्हिडीओ बनवूनही ती याबद्दल बोलत असते. तिचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.

ट्विटरने पायलचं अकाऊंट केलं बंद

पायलनं कास्टिंग काउचबद्दलही अनेक खुलासे केले आहेत. बंगालमधील निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचारावर पायलनं पोस्ट शेअर केली होती तसेच कंगनाचं ट्विटर अकाउंट बंद केल्यावर पायलनं अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर ट्विटरनं आपत्तिजनक पोस्ट शेअर केल्यामुळे तिचं अकाऊंटही बंद केलं.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणातही केले वक्तव्य

पायल रोहतगीनं चर्चेत येण्याची कोणतीही संधी सोडली नाही. सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर ती अनेक महिने टीव्हीवर झळकली. सुशांत प्रकरणात ती बॉलिवूड तज्ज्ञ म्हणून चर्चेत भाग घ्यायची. तिनंही भाजपच्या बाजूनं बोलण्यास सुरवात केली होती. अनेक वेळा पंतप्रधान मोदी आणि अन्य भाजप नेत्यांच्या समर्थनार्थ ती खुलेआम भाष्य करत होती. यानंतर ती राजकारणात तर येणार नाही ना अशा चर्चा होत्या.

संबंधित बातम्या

Rakhi Sawant : बिग बॉसच्या घरात पुन्हा एन्ट्री घेण्यासाठी राखी उत्सुक, म्हणाली यावेळी पती रितेशसोबत यायची इच्छा…

Shah Rukh Khan | बॉलिवूड कारकिर्दीला 30 वर्ष पूर्ण, शाहरुख खान चाहत्यांसाठी शेअर केली भावूक पोस्ट!