Isha Ambani | ईशा अंबानी हिने साधेपणाने जिंकली मने, मुकेश अंबानी यांच्या लेकीचे सर्वत्र काैतुक

| Updated on: Apr 17, 2023 | 10:00 PM

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी ही नेहमीच चर्चेत असते. ईशा अंबानी हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. ईशा अंबानी हिच्या या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

Isha Ambani | ईशा अंबानी हिने साधेपणाने जिंकली मने, मुकेश अंबानी यांच्या लेकीचे सर्वत्र काैतुक
Follow us on

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) व नीता अंबानी यांचे कुटुंब नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन सोहळ्यात फक्त बाॅलिवूड (Bollywood) स्टारच नाही तर हाॅलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते. या उद्घाटन सोहळातील अनेक फोटो आणि व्हिडीओ (Video) हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले. सलमान खान याच्यापासून शाहरूख खानपर्यंत सर्वांचा जलवा या उद्घाटन सोहळ्यामध्ये बघायला मिळाला. या कार्यक्रमामध्ये अनेक बाॅलिवूड स्टारचे डान्स बघायला मिळाले.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी ही कायमच चर्चेत असते. ईशा अंबानी हिचा कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळ्यात खास लूक बघायला मिळाला होता. सध्या सोशल मीडियावर ईशा अंबानी हिचा एक खास व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. ईशा अंबानी हिचा हा व्हिडीओ पाहून लोकांनी तिचे काैतुक करण्यास सुरूवात केलीये. या व्हिडीओमध्ये ईशा अंबानी हिच्यासोबत तिचा पती देखील दिसत आहे.

ईशा अंबानी ही पती आनंद पीरामल याच्यासोबत डिनर डेटला गेली होती. याचाच हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडीओमधील एक खास गोष्ट पाहून ईशा अंबानी हिचे काैतुक करताना लोक दिसत आहेत. ईशा अंबानी हिचा साधा लूक लोकांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. डिनर डेटला अत्यंत साध्या लूकमध्ये ईशा अंबानी ही पोहचली होती.

एकदम साधारण लूकमध्ये ईशा अंबानी ही रेस्टोरेंटमध्ये जाताना दिसत आहे. ईशा अंबानी आणि तिचा पती नॉर्मल कपड्यांवर दिसत आहेत. या व्हिडीओवरून ईशा अंबानी हिचा साधेपणा स्पष्ट दिसत आहे. एकदम सिंपल नाइट सूटमध्ये ईशा अंबानी ही रेस्टोरेंटमध्ये जाताना दिसत आहे. ईशा अंबानी हिच्यासोबत बॉडीगार्ड देखील दिसत आहेत.

रेस्टोरेंटमध्ये अगोदर तिचा पती आनंद पीरामल जातो आणि मग ईशा अंबानी जाते. ईशा अंबानी हिच्या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, ईशा अंबानी ही अनोळखी लोकांना देखील सन्मानपुर्ण बोलते हे विशेष आहे, दुसऱ्याने लिहिले की, किती जास्त क्यूट दिसत आहे ईशा अंबानी, तिसऱ्याने लिहिले की, किती व्यवस्थित आणि साधी राहणी आहे. यावेळी ईशा अंबानी ही फोटोसाठी पोझ देताना देखील दिसली.