मुंबई : श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. पलक तिवारी ही सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. मात्र, चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच पलक तिवारी ही चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच पलक तिवारी (Palak Tiwari) हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमधील पलक तिवारी हिचा लूक पाहून अनेकजण तिच्या भडकले होते. श्वेता तिवारी हिने मुलीच्या बाॅलिवूड पर्दापणासाठी खूप जास्त मेहनत घेतलीये. शेवटी सलमान खान (Salman Khan) याने पलक तिवारी हिला संधी दिली.
नुकताच बाबा सिद्दीकी आणि जीशान सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी पार पडलीये. या इफ्तार पार्टीला बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. आता या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. सलमान खान हा देखील किसी का भाई किसी की जान चित्रपटाच्या टिमसोबत या पार्टीमध्ये सहभागी झाला होता.
श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही देखील या पार्टीत पोहचली होती. मात्र, पार्टीतील पलक तिवारी हिचा लूक पाहून लोक आता तिच्यावर भडकले आहेत. या पार्टीतील पलक तिवारी हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ग्रे रंगाच्या मिरर वर्क लेहंगा चोळीमध्ये या पार्टीत पलक तिवारीही पोहचली होती.
पलक तिवारी हिचा लूक पाहून अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केलीये. एका युजर्सने पलक तिवारी हिच्या या व्हिडीओवर कमेंट करत थेट म्हटले आहे की, इफ्तार पार्टीमध्ये जायचे होते की, तुला आयटम साँग करण्यासाठी? दुसऱ्याने लिहिले की, हिचा लूक पाहून वाटत आहे, आयटम सॉन्ग करण्यासाठीच ही या पार्टीमध्ये गेली आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा पलक तिवारी ट्रोलिंगची शिकार झालीये.
गेल्या काही दिवसांपासून पलक तिवारी हिचे नाव सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान याच्यासोबत जोडले जात आहे. एका मुलाखतीमध्ये तर पलक तिवारी हिने थेट शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याची तारीफ केली होती. आर्यन खान याच्या स्वभावाबद्दल सांगताना पलक तिवारी ही दिसली होती. सलमान खान याच्यावर पलक तिवारी नाराज झाल्याची देखील चर्चा आहे.