मुंबई : रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंह याच्यासह आलिया भट्ट (Alia Bhatt) मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची शूटिंग सध्या काश्मीर येथे सुरू आहे. रणबीर कपूर त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून त्याचा चित्रपट 8 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी रणबीर कपूर याने सांगितले होते की, आलिया तिच्या आगामी चित्रपटाची (Movie) शूटिंग सध्या काश्मीर येथे करत असून मला आलिया आणि मुलगी राहा यांची खूप जास्त आठवण येत आहे. नुकताच आता रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो व्हायरल झाले आहेत.
रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाची शूटिंग काश्मीर येथील गुलमर्ग येथे सुरू आहे. आता सेटवरील काही फोटो व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये अभिनेता रणवीर सिंह हा दिसत आहे. येथे त्याचे आणि आलिया भट्ट हिचे चित्रपटातील गाणे शूट होताना दिसत आहे. फोटोमध्ये पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये रणवीर सिंह हा दिसत आहे.
रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाच्या सेटवरील फोटो व्हायरल झाल्यापासून चाहत्यांमध्ये उत्साह बघायला मिळतोय. या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना चाहते दिसत आहेत. या फोटोमध्ये रणवीर सिंह याचा जबरदस्त अशा लूक दिसत आहे. मात्र, या फोटोमध्ये आलिया भट्ट ही दिसत नाहीये.
Ranveer Singh during the “Rocky aur Rani Ki Prem Kahani” shooting in Kashmir..?@RanveerOfficial#ranveersingh #actors #bollywoodactor #shooting #celebrity #femousactor #rockyaurranikipremkahani #newmovie #fillamwala pic.twitter.com/fB8ujrguKe
— Fillamwala (@fillamwala) March 5, 2023
गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंह याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. नुकताच रिलीज झालेला सर्कस हा चित्रपट देखील रणवीर सिंह याचा फ्लाॅप गेलाय. रोहित शेट्टी, रणवीर सिंह याच्यासोबत चित्रपटाची संपूर्ण टिम चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसली होती. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेला.
फक्त सर्कस हाच चित्रपट नाहीतर रणवीर सिंह याचे दुसरेही चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाल करू शकले नाहीत. आता रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट काय धमाल करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट अगोदर 28 एप्रिल रोजी रिलीज होणार होता. मात्र, चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये मोठा बदल करण्यात आला असून हा चित्रपट जुलैमध्ये रिलीज होणार आहे.