मुंबई : टॉलीवूडपासून बॉलिवूडमध्ये धमाकेदार प्रवास करणारी अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) ही सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याचे कारणही तेवढे खास आहे. सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटामध्ये पूजा हेगडे ही मुख्य भूमिकेत आहे. सलमान खान आणि पूजा हेगडे यांची जोडी पडद्यावर काय धमाका करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटातील अनेक गाणे रिलीज झाले आहेत. या गाण्यांमध्ये पूजा हेगडे हिचा लूक जबरदस्त दिसलोय. विशेष म्हणजे किसी का भाई किसी की जान या चित्रपटामधील पूजा हेगडे आणि सलमान खान (Salman Khan) यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडताना दिसत आहे.
किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर पूजा आणि सलमान खान यांची जोडी चर्चेत आहे. इतकेच नाही तर गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा सातत्याने सुरू आहे की, पूजा हेगडे आणि सलमान खान हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. विशेष म्हणजे जेंव्हापासून यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू आहेत, तेंव्हापासून चाहते देखील उत्साही झाले आहेत.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पूजा हेगडे हिचा भाऊ ऋषभ हेगडे याचे लग्न होते, या लग्नसोहळ्यात देखील सलमान खान उपस्थित होता. या लग्नातील अनेक फोटो व्हायरल झाले, या फोटोमध्ये सलमान खान हा पूजा हेगडे हिच्या कुटुंबासोबत दिसला. सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून शहनाज गिल ही देखील बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
सतत सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच आता पूजा हेगडे हिने यावर अत्यंत मोठे भाष्य केले आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना पूजा म्हणाली की, मी सिंगल आहे आणि मला सिंगल राहणे आवडेल. मुळात म्हणजे सध्या मला माझ्या करिअरवर लक्ष द्यायचे आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणे हे माझे सध्या टार्गेट आहे. यामुळे मी कोणत्याच अफवांवर लक्ष देत नाही.
म्हणजे आता पूजा हेगडे हिने सलमान खान याच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर नकार दिला आहे. सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातील चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे.