मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ (Lock Upp) या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये तिने तिच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे केले होते. आता पुन्हा एकदा ती तिच्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. नुकतंच पापाराझींनी मुंबईत पूनमचे काही फोटो आणि व्हिडीओ शूट केले. हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट होताच क्षणार्धात ते व्हायरल झाले. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या असून अनेकांनी तिला ट्रोल (Trolled) केलंय. पूनम नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. तिच्या याच बोल्ड अंदाजामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय.
काही कामानिमित्त मुंबईत बाहेर फिरत असताना काही पापाराझींनी पूनमचे फोटो आणि व्हिडीओ काढले. यावेळी तिने काही चाहत्यांसोबत सेल्फीसुद्धा काढले. मात्र यावेळी पूनमने जे कपडे परिधान केले होते, ते पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करण्याता सुरुवात केली. ‘तुला जरा पण लाज वाटत नाही का’, असा सवाल एका नेटकऱ्याने केला. तर ‘पब्लिसिटी स्टंटसाठी कसेही कपडे घालते’, असं दुसऱ्याने म्हटलं. पूनमने ब्रालेस टॉप घातल्याने तिच्यावर टीकांचा वर्षाव होऊ लागला. मात्र त्यावरून काहींनी तिला पाठिंबासुद्धा दिला. ‘कसे कपडे परिधान करावेत, हा तिचा निर्णय आहे’, असं एका युजरने म्हटलं. तर ‘ब्रालेस टॉप घालण्यात काही गैर नाही’, असं दुसऱ्याने लिहिलं.
याआधीही पूनमला सार्वजनिक ठिकाणी बोल्ड कपड्यांमध्ये पाहिलं गेलंय. ट्रोलिंगला न जुमानता पूनम अनेकदा बोल्ड अंदाजात पहायला मिळते. अभिनेत्री उर्फी जावेद आणि पूनम पांडे हे नेहमी त्यांच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. याशिवाय पूनम तिच्या खासगी आयुष्यामुळेही प्रकाशझोतात आली होती. पती सॅम बॉम्बेवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप तिने केला.
पूनमने 2013 मध्ये ‘नशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने एका शिक्षिकेची भूमिका साकारली होती, जिचे तिच्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध असतात. या चित्रपटानंतरचा काळ खूप कठीण असल्याचं सांगत पूनम ‘लॉक अप’ या शोमध्ये म्हणाली, “त्या चित्रपटानंतर मला ज्या काही ऑफर्स येत होत्या ते मी घेऊ नये असं अनेक लोक सांगू लागले. मला अभिनय करायचं आहे, चित्रपटांमध्ये काम करायचं आहे असं मी त्यांना सांगू इच्छिते. मी उत्तम डान्सर आहे आणि अभिनेत्रीसुद्धा आहे, हे मला सिद्ध करून दाखवायचं आहे. चुकीचे निर्णय घेऊन माझी दिशाभूल झाली. पण आता मी योग्य मार्ग निवडणार आहे.”