मुंबई : पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे अजूनही चर्चेत आहे. दीपिका पादुकोण हिने या गाण्यामध्ये भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने अनेकांच्या पचणी हे पडले नाही. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिस काही खास धमाका करू शकत नाहीयेत. त्यामध्येच बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर बॉयकॉट पठाणचा ट्रेंड सुरू आहे. बॉयकॉट ट्रेंडचा फटका यापूर्वी आमिर खानचा लाल सिंह चढ्डा या चित्रपटाला बसला आहे. आता हाच ट्रेंड सोशल मीडियावर पठाण विरोधात देखील सुरू आहे.
बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यापासूनच मोठ्या प्रमाणात शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांना ट्रोल केले जात आहे. बाॅलिवूडसह अनेक टीव्ही कलाकार आता या गाण्याच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.
काही दिवसांपूर्वी तारक मेहता का उल्टा चश्मा फेम बबिता जी हिने बेशर्म रंग गाण्यावर जबरदस्त डान्स करत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता. इतकेच नाहीतर अभिनेत्री नेहा शर्मा हिने भगव्या रंगाची बिकिनी घालून नुकताच बोल्ड फोटोशूट केले.
Us: So much to do but first let’s dance! https://t.co/8UvxXm283G
Celebrate #Pathaan with #YRF50 only at a big screen near you on 25th January 2023. Releasing in Hindi, Tamil, and Telugu. pic.twitter.com/JtWtQp1n9g
— Yash Raj Films (@yrf) December 21, 2022
आता बेशर्म रंग या गाण्याचे समर्थन पूनम पांडे हिने देखील केले आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पूनम पांडे म्हणाली, बेशर्म रंग या गाण्यावर जो वाद सुरू आहे, त्यावर बोलणे म्हणजे बेवकूफी आहे.
पुढे पूनम म्हणाली, खरोखरच बेशर्म रंग हे गाणे खूप जास्त चांगले आहे. या गाण्यामध्ये दीपिका पादुकोणचा लूक जबरदस्त दिसतोय. या गाण्यामध्ये सर्वात भारी माझा SRK आहे. कोण त्यांच्यासारखे इतके हाॅट दिसते.
हा गुन्हा आहे…पाप आहे…असे करू नका सर…बाॅलिवूडसह अनेक टीव्ही अभिनेत्रींनी देखील पठाण चित्रपटातील बेशर्म रंग या गाण्याचे समर्थन केले आहे.