नुसरत जहांच्या गॉगलमध्ये दिसली ‘त्या’ खास व्यक्तीची झलक, कमेंट करत चाहत्यांनी केला प्रश्नांचा भडीमार!

| Updated on: Jul 01, 2021 | 3:40 PM

खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहां (Nusarat Jahan) आजकाल तिच्या गर्भावस्थेमुळे खूप चर्चेत आहे. यापूर्वी अभिनेत्री गर्भवती असल्याचा केवळ अंदाज वर्तवला जात होता. पण, आता नुसरतने स्वत: बेबी बंपसह फोटो शेअर करण्यास सुरुवात केली आहे.

नुसरत जहांच्या गॉगलमध्ये दिसली ‘त्या’ खास व्यक्तीची झलक, कमेंट करत चाहत्यांनी केला प्रश्नांचा भडीमार!
नुसरत जहां
Follow us on

मुंबई : खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहां (Nusarat Jahan) आजकाल तिच्या गर्भावस्थेमुळे खूप चर्चेत आहे. यापूर्वी अभिनेत्री गर्भवती असल्याचा केवळ अंदाज वर्तवला जात होता. पण, आता नुसरतने स्वत: बेबी बंपसह फोटो शेअर करण्यास सुरुवात केली आहे. नुसरत जगाची पर्वा न करता आपले सोशल मीडिया अकाऊंट नियमितपणे अपडेट करत असते. पण, यादरम्यान तिच्या चाहत्यांनी असे काहीतरी पाहिले, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे (Pregnant Nusrat Jahan flaunts her baby bump in new Instagram pictures).

नुसरतच्या फोटोंमध्ये एक खास झलक पाहायला मिळाली!

नुकतीच नुसरत जहांने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नुसरतने सैल पांढरा टीशर्ट घातला आहे. ज्यामध्ये ती बेबी-बंप लपवण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे. नुसरतने या फोटोंमध्ये सनग्लासेस अर्थात गॉगल परिधान केला आहे. आणि एक व्यक्ती या मोठ्या सनग्लासेसमध्ये फोटो काढताना रिफ्लेक्ट होत आहे.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हे फोटो शेअर केल्यावर नुसरतच्या चाहत्यांनी असा अंदाज लावायला सुरुवात केली आहे की, हे फोटो काढणारी व्यक्ती म्हणजेच तिचा कथित बॉयफ्रेंड यश शिवाय इतर कोणी नाही. काही वेळातच नुसरतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. तर, दुसरीकडे चाहत्यांनी या पोस्टवर अनेक प्रश्नांचा भडीमार केला. काहींनी त्यांना , ‘यश बाळाचं पालकत्व स्वीकारणार का?’ असा प्रश्न देखील केला आहे.

पाहा पोस्ट :

लग्न वादात

नुसरत जहां यांनी पती निखिल जैन यांच्यावर गंभीर आरोप केले होते आणि दोघांचेही मतभेद झाल्याचे उघड केले. यादरम्यान असे म्हटले होते की, तुर्कीमधील त्यांचे लग्न भारत देशात अवैध आहे, त्यामुळे घटस्फोटाचा प्रश्नच उद्भवत नाही. काही दिवसांपूर्वी नुसरतने निखिल जैनसोबतची सर्व छायाचित्रे तिच्या इंस्टाग्रामवरून डिलीट केली होती. दुसरीकडे निखिल जैन यांनी निवेदन जारी केले होते की लग्नानंतर लवकरच नुसरतची वृत्ती बदलली आणि तिनेच आपल्या देशात लग्न नोंदणी करण्यास नकार दिला.

लग्नाला पूर्ण झाली दोन वर्ष

19 जूनला नुसरत आणि निखिलच्या लग्नाचा दुसरावाढदिवस होता. मात्र, हे दोघे लग्नाच्या दुसर्‍या वाढदिवशी वर्षी एकत्र नव्हते. 19 जून 2019 रोजी या दोघांनी तुर्कीच्या बोड्रम सिटी येथे सात फेरे घेतले होते. दोघांचे लग्न हिंदू आणि ख्रिश्चन प्रथेनुसार पार पडले होते. कोलकाता येथील आयटीसी रॉयल हॉटेलमध्ये नुसरत आणि निखिल यांनी आपल्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन आयोजित केले होते. या सोहळ्यात राजकारण आणि चित्रपट जगातातील, इतर क्षेत्रातील बरीच मोठी व्यक्तिमत्त्वे हजर होती.

निखिलने नाकारले पालकत्व

आता नुसरत गर्भवती आहे आणि तिचा नवरा निखिल जैन याने हे मूल आपले नसल्याचे स्पष्ट केले आहे, इतकेच नाही तर नुसरत आणि तो बर्‍याच दिवसांपासून स्वतंत्र राहत आहेत. दुसरीकडे, नुसरतने तिच्या लग्नाला लिव्ह-इन रिलेशनशिप असल्याचे म्हटले आहे. अशी चर्चा देखील सुरु आहे की, सध्या नुसरत बंगाली अभिनेता यशदास गुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

(Pregnant Nusrat Jahan flaunts her baby bump in new Instagram pictures)

हेही वाचा :

Naseeruddin Shah Health Update | नसीरुद्दीन शाहंच्या तब्येतीत सुधारणा, लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार

Kareena Kapoor-Khan | बॉलिवूड करिअरला 21 वर्ष पूर्ण, करीना कपूरने खास video शेअर करत सांगितला पुढचा प्लॅन