Hungama 2 | ‘हंगामा 2’द्वारे तब्बल 8 वर्षानंतर प्रियदर्शन यांचं कमबॅक, एक नजर त्यांच्या सुपरहिट विनोदी चित्रपटांवर!

| Updated on: Jul 23, 2021 | 2:39 PM

प्रसिद्ध चित्रपट निर्माते प्रियदर्शन (Priyadarshan) तब्बल आठ वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर बॉलिवूडमध्ये परतत असून, 2003मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या लोकप्रिय कॉमेडी चित्रपट ‘हंगामा’चा सिक्वेल अर्थात ‘हंगामा 2’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत.

Hungama 2 | ‘हंगामा 2’द्वारे तब्बल 8 वर्षानंतर प्रियदर्शन यांचं कमबॅक, एक नजर त्यांच्या सुपरहिट विनोदी चित्रपटांवर!
प्रियदर्शन
Follow us on

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माते प्रियदर्शन (Priyadarshan) तब्बल आठ वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर बॉलिवूडमध्ये परतत असून, 2003मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या लोकप्रिय कॉमेडी चित्रपट ‘हंगामा’चा सिक्वेल अर्थात ‘हंगामा 2’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत.

2005 मध्ये सलमान खानसोबत ‘क्यों की…’पासून, 2007मध्ये शाहरुख खानसोबत बिल्लू आणि अक्षय कुमार सोबत ‘हेरा फेरी’, ‘गरम मसाला’ आणि ‘भूल भुलैया’ सारखे अनेक हिट चित्रपट देत त्यांनी बॉलिवूडमधील काही मोठ्या नावांसह काम केले आहे.

ड्रामापासून ते विनोदी चित्रपटांपर्यंत अनेक भाषांमधून सुमारे चार दशकांपासून चित्रपट बनवणारे दिग्दर्शक प्रियदर्शन 2000च्या दशकात खूप लोकप्रिय झाले. ‘हलचल’, ‘हंगामा’, ‘भागम भाग’ आणि ‘मालामाल विकली’ सारखे ‘बॅक टू बॅक’ हिट चित्रपट देत प्रियदर्शन हे बॉलिवूडमधील विनोदी चित्रपटांचा चेहरा बनले. तब्बल 8 वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर बॉलिवूडमध्ये परतत असून, 2003मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या लोकप्रिय कॉमेडी चित्रपट ‘हंगामा’चा सिक्वेल अर्थात ‘हंगामा 2’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. याच निमित्ताने आपण त्यांच्या काही गाजलेल्या विनोदी चित्रपटांवर नजर टाकूया…

‘हेरा फेरी’

‘हेरा फेरी’ हा चित्रपट 2000मध्ये प्रदर्शित झाला होता परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या तिघांच्या विनोदी अभिनयाने ‘हेरा फेरी’ खूप गाजला. या दोन दशकांत सुनील शेट्टी याने स्वतःचा फॅन बेस विकसित केला होता.

‘चुप चुप के’

आर्थिक संकटामुळे एक तरूण मुका व्यक्ती म्हणून कसा जगला हे ‘चुप चुप के’ या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

‘भागम भाग’

स्टेज कलाकारांचा एक समूह, एकत्र परदेशात जाण्यासाठी धडपडत असताना एका  खून / आत्महत्येच्या प्रकरणात कसा अडकतो याची कथा ‘भागम भाग’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि गोविंदा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

‘हलचल’

अंजली (करीना कपूर खान) आणि जय (अक्षय खन्ना) दोन परस्परविरोधी कुटुंबातील आहेत आणि बदला घेण्यासाठी फक्त प्रेमात असल्याची बतावणी करतात. तथापि, जेव्हा ते खरोखर प्रेमात पडतात आणि त्यांच्या कुटुंबियांना एकत्र आणण्याचा निर्णय घेतात, तेव्हा त्यांचा काय गोंधळ उडतो हे ‘हलचल’ चित्रपटात  दाखवण्यात आले आहे.

‘भूल भुलैया’

‘भूल भुलैया’ या चित्रपटात एक अनोखी कथा सादर करण्यात आली होती. भय आणि विनोद असा दोन्हीचा मिलाप यात पाहायला मिळाला. या चित्रपटात अक्षय कुमार याने मुख्य भूमिका साकारली होती.

(Priyadarshan’s comeback after 8 years with ‘Hangama 2’, a look at his superhit comedy films)

हेही वाचा :

Raj Kundra Case Update | राज कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ, न्यायालयाकडून 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Shilpa Shetty’s First Reaction | पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीची पहिली प्रतिक्रिया, व्यक्त केल्या मनातील भावना