मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. प्रियांका चोप्रा हिने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती, या मुलाखतीमध्ये तिने काही धक्कादायक खुलासे केले. प्रियांका चोप्रा हिचे बोलणे ऐकून सर्वजण हैराण झाले. विशेष म्हणजे त्यानंतर काही दिवसांमध्येच प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये दाखल झाली. प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडमधील (Bollywood) काळे सत्य सांगितले. प्रियांका चोप्रा हिच्या समर्थनार्थ अनेकजण मैदानात येत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्यापासून कंगना राणावतपर्यंत अनेकांनी प्रियांका चोप्रा हिचे समर्थन केले.
प्रियांका चोप्रा म्हणाली होती की, बाॅलिवूडमध्ये मोठे राजकारण सुरू होते. मला एका कोपऱ्यात टाकण्याचा प्रयत्न सतत सुरू होता, यामुळे बऱ्याच लोकांसोबत माझा वाद होत होता. मला राजकारण करायला कधी जमले नाही. यामुळे मी शेवटी कंटाळून थांबण्याचा निर्णय घेतला. कारण त्यापुढे मी संघर्ष करू शकत नव्हते.
प्रियांका चोप्रा हिचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. मुलगी मालती आणि पती निक जोनस यांच्यासोबत काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये आली होती. प्रियांका चोप्राचे मुंबई विमानतळावरील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले. प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असते.
सध्या प्रियांका चोप्रा हिचे लंडनमधील काही खास फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा हिच्यासोबत पती निक जोनस देखील दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या एका फोटोमध्ये चक्क रस्त्यावरच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे चक्क लिपलॉक करताना दिसले.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचे लिपलॉकचे फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, या दोघांना परत एकदा सोबत पाहून मला खूप जास्त आनंद होत आहे. दुसऱ्याने लिहिले की, लव बर्ड्स…, तिसऱ्याने लिहिले की, मालती कुठे आहे?
प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडवर केलेल्या आरोपांनंतर करण जोहर हा लोकांच्या निशाण्यावर आला. कारण काही वर्षांपूर्वी प्रियांका चोप्रा हिला करण जोहर याच्या पार्टीमध्ये बंदी होती. प्रियांका चोप्रा हिने आरोप केल्यानंतर कंगना राणावत हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत करण जोहर याला टार्गेट केले होते.