मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आले. विशेष म्हणजे नुकताच प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही भारतामध्ये येऊन गेलीये. विमानतळावरील तिचे काही फोटो आणि व्हिडीओ (Video) व्हायरल झाले होते. प्रियांका चोप्रा ही पहिल्यांदाच मुलगी मालती हिला घेऊन भारतामध्ये दाखल झाली. प्रियांका आणि मालती यांच्यासोबतच निक जोनस हा देखील भारतामध्ये आला होता. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमुळे प्रियांका चोप्रा ही सतत चर्चेत आहे. या मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडबद्दल काही धक्कादायक खुलासे (Shocking revelation) केले होते.
नुकताच आता प्रियांका चोप्रा हिने एक मुलाखत दिलीये, या मुलाखतीमध्येही तिने अनेक विषयांवर भाष्य केले आहे. ज्यामुळे प्रियांका चोप्रा ही पुन्हा एकदा चर्चेत आहे. या मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूड सोडून हाॅलिवूडकडे येण्याचे थेट कारणही सांगून टाकले. बाॅलिवूडमध्ये प्रचंड राजकारण सुरू असल्याचे सांगताना देखील प्रियांका चोप्रा ही दिसली.
नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा हिला थेट करण जोहर याच्यासोबत असलेल्या वादावर विचारण्यात आले. शाहिद कपूर याच्यासोबतच्या अफेअरवर देखील प्रियांका चोप्रा हिला विचारण्यात आले. यावर प्रियांका चोप्रा म्हणाली की, बाॅलिवूडमध्ये शाहिद कपूर हा माझा कधी मित्र नव्हता. पुढे प्रियांका म्हणाली, मुळात माझे खूप कमी मित्र आहेत, जे आहेत ते खूप जवळचे आहेत.
पुढे प्रियांका म्हणाली, मी बाॅलिवूडमधील कोणत्याच कॅंपचा हिस्सा नाहीये. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडवर गंभीर आरोप केले होते. प्रियांका चोप्रा हिने थेट म्हटले की, मला बाॅलिवूडमध्ये एका कोपऱ्यात टाकण्याचे काम सुरू होते. इतकेच नाहीतर मला चित्रपटांच्या आॅफर दिल्या जात नव्हत्या. यामुळे मी कंटाळून थांबण्याचा निर्णय घेतला.
शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांच्या अफेअरच्या चर्चा काही वर्षांपूर्वी रंगल्या होत्या. मात्र, यावर कधीच काही खुलासा झाला नाही. रिपोर्टनुसार या प्रकरणात गौरी खान हिने करण जोहर याला मदत मागितली होती. शाहरुख खान याच्यासोबतच्चा अफेअरवर देखील प्रियांका चोप्रा हिला प्रश्न विचारण्यात आला की, शाहरुख खान याच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर भाष्य केले नाही म्हणजे तू कधीच समर्थन नाही किंवा खंडनही नाही केले. यावर प्रियांका चोप्रा म्हणाली की, या प्रकरणात मी काहीही बोलले असते तरीही लोकांनी मला खोटे ठरवले असते.