मुंबई : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा आज दिल्लीमध्ये साखरपुडा पार पडतोय. या साखरपुड्याची जंगी तयारी देखील सुरू आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याला अनेक राजकिय लोकांची उपस्थिती असणार आहे. बाॅलिवूडमधील देखील मोठे स्टार हजेरी लावण्याची दाट शक्यता आहे. नुकताच आपल्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) देखील पोहचली आहे. भारतामध्ये आल्यानंतर विमानतळावर प्रियांका चोप्रा ही स्पाॅट झालीये. प्रियांका चोप्रा हिचे विमानतळावरील अनेक फोटो आणि व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसत आहेत. मात्र, विमातळावर प्रियांका चोप्रा हिच्या टिमसोबत धक्काबुक्की करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, प्रियांका चोप्रा हिला पाहुण अनेकांनी तिच्या भोवती गर्दी केली. सेल्फी घेण्यासाठी लोक प्रयत्न करत होते. एक माणूस प्रियांका चोप्रा हिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी जवळ आला. मात्र, प्रियांका चोप्रा हिच्या सुरक्षारक्षकांनी त्याला दूर केले. मात्र, त्या व्यक्तीसोबत प्रियांका चोप्रा ही फोटो घेण्यासाठी थांबली.
हे सर्व सुरू असतानाच अचानक एक व्यक्ती प्रियांका चोप्रा हिच्या अत्यंत जवळ आली. त्यानंतर या व्यक्तीला मागे करत असताना त्याने प्रियांका चोप्रा हिच्या सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की करण्याचा थेट प्रयत्न केला. हा सर्व प्रकार आता कॅमेऱ्यात कैद झाला आहे. परिणीती चोप्रा हिच्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये दाखल झालीये.
गेल्या काही दिवसांपासून प्रियांका चोप्रा ही सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा ही तिची मुलगी मेरी मालती आणि पती निक जोनस यांच्यासोबत भारतामध्ये आली होती. विशेष म्हणजे मेरी मालती ही पहिल्यांदाच भारतामध्ये आली होती. प्रियांका चोप्रा हिचे त्यावेळी सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल झाले होते.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा ही मोठा खुलासा करताना दिसली. प्रियांका चोप्रा हिने थेट बाॅलिवूडमधील काळे सत्य सांगितले. प्रियांका चोप्रा म्हणाली होती की, मला बाॅलिवूडमध्ये एका कोपऱ्यात टाकण्याचा प्रयत्न सुरू होता. मला काम दिले जात नव्हते. इतकेच नाही तर बाॅलिवूडमध्ये मोठे राजकारण सुरू होते. या सर्व गोष्टींना कंटाळून मी थांबण्याचा निर्णय घेतला होता. कारण मला इतर लोकांप्रमाणे कधीच राजकारण हे करता आले नाही.