मुंबई : कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमारने 29 ऑक्टोबर रोजी या जगाचा अचानक निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. पुनीत अवघ्या 46 वर्षांचा होता आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. फिटनेस फ्रिक असलेल्या पुनीतने जिममध्ये दोन तास व्यायाम केल्यानंतर छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. पुनीतची तब्येत बिघडल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तसे होऊ शकले नाही.
अभिनेत्याने आपल्या वडिलांप्रमाणेच डोळे दान करण्याचा संकल्प केला होता. प्रसिद्ध अभिनेते डॉ. राजकुमार यांनी स्वतः 1994 मध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे डोळे दान करण्याचा संकल्प केला होता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की डॉ. राजकुमार यांचाही 2006 साली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. पुनीतच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा तासांत डॉक्टरांच्या पथकाने नेत्रदानासाठी ऑपरेशन केल्याचे अभिनेता चेतन कुमार यांनी ट्विट करत सांगितले.
अभिनेत्याने लिहिले की, ‘मी जेव्हा अप्पू सरांना बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये होतो, तेव्हा त्यांच्या मृत्यूनंतर सहा तासांच्या आत डॉक्टरांचा एक गट त्यांचा नेत्रदानाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आला होता. राजकुमार आणि निम्माशिवा या डॉक्टरांप्रमाणे अप्पू सरांनीही नेत्रदान केले.’ यासोबतच अभिनेत्याने हे उदाहरण म्हणून घेत त्याच्या पावलावर पाऊल ठेवून नेत्रदान करण्याचे आवाहन केले.
As son of KFI’s most popular legend, Appu Sir could have chosen any type of films or roles
Yet, instead of violent/cruel/dubious hero-glorification movies, he opted for wholesome content that entire family could enjoy together
Art—not pocketbook— took front seat
We admire that pic.twitter.com/vUbD8yDuRR
— Chetan Kumar Ahimsa / ಚೇತನ್ ಅಹಿಂಸಾ (@ChetanAhimsa) October 30, 2021
पुनीतची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच शिवराजकुमार यांची कन्या निवेदिता रुग्णालयात पोहोचली होती. पुनीतच्या निधनानंतर स्टार रविचंद्रन आणि निर्माते जयन्ना आणि केपी श्रीकांत यांनीही हॉस्पिटलला भेट दिली. पुनीतच्या मृत्यूच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला होता.
पुनीत केवळ अभिनेताच नव्हता तर गायकही होता. त्यांचा जन्म 17 मार्च 1975 रोजी झाला. त्याने 2002 मध्ये ‘अप्पू’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी 29हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते.
पुनीत हे दक्षिण भारतीय चित्रपटांमधील प्रसिद्ध नाव होते. पुनीतचे वडील राजकुमार हे इंडस्ट्रीतील मोठे नाव होते. ते कन्नड चित्रपटसृष्टीचे आयकॉन मानले जायचे. दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारे कन्नड इंडस्ट्रीतील ते पहिले अभिनेता होते. लहानपणापासूनच पुनीतचे वडील राजकुमार त्याला आणि त्याच्या बहिणीला चित्रपटाच्या सेटवर घेऊन जायचे. कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्यांपैकी पुनीत एक होते.
मंगळसूत्राची जाहिरात मोठ्या वादात, सेलिब्रिटी डिझायनर सब्यासाची विरोधात नोटीस जारी!