मुंबई : अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदानाचे (Rashmika Mandanna) चाहते त्यांच्या ‘पुष्पा’ (Pushpa) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. आता हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. ‘पुष्पा’मध्ये अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असून, बॉक्स ऑफिस कलेक्शनही चांगले झाले आहे.
‘पुष्पा’ हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला समीक्षकांसोबतच प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला आहे. पुष्पाने पहिल्या दिवशी शानदार ओपनिंग केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनच्या पुष्पाने पहिल्याच दिवशी 45 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. अल्लूच्या या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. पुष्पाने हिंदी भाषेत 3 कोटींचा व्यवसाय केला आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, या चित्रपटाने आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सर्वाधिक व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने जवळपास 30 कोटींचा व्यवसाय केला आहे. पुष्पा हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज झाला आहे.
सध्या बॉक्स ऑफिसवर दोन उत्तम चित्रपट आहेत. पहिला ‘पुष्पा’ आणि दुसरा हॉलिवूडपट ‘स्पॅडरमॅन’. पुष्पाने स्पायडरमॅनलाही कलेक्शनमध्ये मात दिली आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी जवळपास 22 कोटींचा व्यवसाय केला आहे.
पुष्पाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबत फहाद फसल, प्रकाश राज महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. या चित्रपटात साऊथ क्वीन समंथाचे एक आयटम साँगही आहे. ज्याला खूप पसंती दिली जात आहे. हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार होता. पहिला भाग प्रदर्शित झाला असून, दुसरा भाग पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, हा चित्रपट एका चंदन तस्करावर आधारित आहे. ज्यामध्ये अल्लू अर्जुन स्मगलरच्या भूमिकेत दिसला आहे. हा चित्रपट अॅक्शनने भरलेला असून, अल्लू अर्जुनने आपल्या अभिनयाने आणि संवादफेकीने सर्वांची मने जिंकली आहेत. यासोबतच रश्मिकाही लोकांच्या अपेक्षांवर खरी उतरली आहे. यावेळी तिची वेगळी स्टाईल प्रेक्षकांना पाहायला मिळाली.