राधिका आपटे चित्रपटसृष्टीतील एक प्रसिध्द नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राधिका हीट चित्रपटांमध्ये जबरदस्त अशी भूमिका करते आहे. राधिकाची फॅन फाॅलोइंगही मोठी आहे.
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राधिकाने मोठा गाैप्यस्फोट केला आहे. राधिकाने जरा स्पष्ट बोलत सांगितले की, अनेकदा चित्रपटातील भूमिकेसाठी तिला रिजेक्ट केले गेले.
त्याचे कारणही राधिकाने सांगितले असून राधिका म्हणाली की, आज बाॅलिवूडमध्ये तुमच्या अभिनयापेक्षा तुम्ही किती जास्त तरूण दिसतात, याला महत्व आहे.
या गोष्टीमुळेच तरूण दिसण्यासाठी अनेक अभिनेत्री काम मिळावे म्हणून सतत आपल्या शरीराच्या विविध भागांच्या सर्जरी करत असतात.
मलाही अनेकांनी सल्ला दिला की, तू सर्जरी करून घे...मग तुला नक्कीच मोठ्या प्रमाणात काम मिळेल. मात्र, मी कधीच अजूनही सर्जरी केली नाहीये.
म्हणजे काय तर बाॅलिवूडमध्ये तुमच्या अभिनयापेक्षा तुमच्या तरूण दिसण्याला अधिक महत्व आहे. मात्र, असे असूनही मी कधीच सर्जरी केली नसल्याचे राधिका म्हणाली आहे.