परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा ‘या’ दिवशी अत्यंत राॅयल पद्धतीने पार पडणार साखरपुडा, तारीख, वेळ आणि ठिकाण जाणून घ्या

| Updated on: May 09, 2023 | 6:58 PM

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे एकमेकांना डेट करत होते. मुंबईमध्ये यांना अनेकदा स्पाॅट केले गेले. सतत यांच्या लग्नाची चर्चा रंगताना दिसत होती. शेवटी आता यांच्या साखरपुड्याची तारीख पुढे आलीये.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा या दिवशी अत्यंत राॅयल पद्धतीने पार पडणार साखरपुडा, तारीख, वेळ आणि ठिकाण जाणून घ्या
Follow us on

मुंबई : आम आदमी पक्षाचा खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) आणि बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. सतत यांच्या साखरपुड्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. हे दोघे कायमच सोबत स्पाॅट होतात. पापाराझी यांनी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये बऱ्याच वेळा परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना कैद केले आहे. मात्र, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी अजूनही त्यांच्या नात्यावर काहीच भाष्य केले नाहीये. दोघेही एकमेकांवर बोलण्यास टाळून लाजताना दिसतात. गेल्या महिन्यातच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा सुपारीचा कार्यक्रम पार पडल्याची चर्चा होती.

चाहते सतत परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची वाट पाहताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी आलेल्या एका रिपोर्टमध्ये मे महिन्यात परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे साखरपुडा करणार असल्याचे म्हटले होते. शेवटी ते खरे झाले असून याच महिन्यात परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा हा पार पडणार आहे. नुकताच आलेल्या रिपोर्टमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची तारीख पुढे आलीये.

13 मेला परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा दिल्ली येथे पार पडणार आहे. 150 लोकांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत राॅयल पध्दतीने परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा पार पडणार आहे. सेंट्रल दिल्लीमध्ये साखरपुड्याच्या खास कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. सतत काही दिवसांपासून परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे एकमेकांना डेट करत होते.

शेवटी आता यांच्या साखपुड्याची तारीख पुढे आलीये. सकाळी सुखमनी साहिब यांचा पाठ होईल आणि मग साखरपुड्याच्या विधीला सुरूवात केली जाणार आहे. आम आदमी पार्टीच्या एका मोठ्या नेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत काही दिवसांपूर्वीच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

आज सकाळीच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. मुंबई विमानतळावरील यांचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे जबरदस्त लूकमध्ये दिसत होते. व्हिडीओमध्ये परिणीती चोप्रा ही राघव चड्ढा याला काहीतरी विचारताना दिसत होती. याचवेळी एक अंदाज लावला जात होता की, साखरपुड्यासाठीच हे दोघे दिल्लीकडे रवाना झाले.