मुंबई : राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्याशी संबंधित अश्लील प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. पूनम पांडे (Poonam Pandey) आणि सागरिका शोनासारख्या (Sagarika Shona) मॉडेल्सनी राज कुंद्रावर यापूर्वीही गंभीर आरोप केले आहेत. आता या यादीत आणखी एका मॉडेलचं नाव जोडलं गेलं आहे, असा दावा आहे की तिला राज कुंद्राच्या हॉटशॉट्स अॅपवर न्यूड शूटसाठी दर दिवसाला 25,000 रुपयांची ऑफर देण्यात आली होती. निकिता फ्लोरा सिंह असं या मॉडेलचं नाव आहे. राज कुंद्रा यांचे वैयक्तिक सहाय्यक उमेश कामत यांनी ही ऑफर केल्याचा आरोप निकितानं केला आहे.
निकिता फ्लोरा सिंहनं आपल्या एका ट्विटद्वारे हे आरोप केले आहेत. निकितानं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे – नोव्हेंबर 2020 मध्ये मला उमेश कामत यांनी राज कुंद्राच्या हॉटशॉट्स अॅपसाठी न्यूड शूटबद्दलही विचारलं होतं, मात्र मी नकार दिला. कामतनं मला यासाठी दर दिवसाला 25,000 रुपये ऑफर केले होते. देवाचे आभार मानते की मी कुंद्रासारख्या मोठ्या नावात पडले नाही.
वाचा निकिता फ्लोरा सिंहचे ट्विट
I was also asked by #UmeshKamat to shoot #nude for #rajkundra‘s app #Hotshots in Nov 2020,but I refused. Kamat offered Rs 25k/day. Thank God I did not fall for big name of https://t.co/KqaIglFBEU girl from #jharkhand got divorce from her husband because she shot for them. pic.twitter.com/YHCaJ79FRD
— Nikita Flora Singh (@NikitaFloraS) July 21, 2021
यासोबतच निकितानं हे देखील उघड केलं की झारखंडमधील एका महिलेनं केवळ हॉटशॉट्ससाठी शूट केल्यामुळे तिचा घटस्फोट झाला आहे. निकिता लिहिलं – झारखंडमधील एका महिलेला तिच्या पतीने घटस्फोट दिला होता कारण तिनं हॉटशॉट्ससाठी शूट केलं होतं.
निकितापूर्वी या मॉडेल्सने केले आरोप
राज कुंद्रा अश्लीलता प्रकरण उघड झाल्यानंतर एकामागून एक मॉडेल, हॉटशॉट्सवर गंभीर आरोप करत आहे. निकिताच्या आधी सागरिका शोना सुमन आणि पूनम पांडे यांनी राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीवर न्यूड शूट करण्याची विचारणा केल्याचा आरोप केला होता. एकीकडे पूनम पांडेनं असा दावा केला होता की तिचा राज कुंद्रा कंपनीबरोबर करार संपला तेव्हा त्याच्या कंपनीतील लोकांनी तिला जिवे मारण्याची आणि बलात्कार करण्याची धमकी दिली होती. इतकंच नाही तर पूनम पांडेनं तिचा वैयक्तिक नंबर राज कुंद्राच्या कंपनीने लीक केल्याचा आरोप केला होता.
दुसरीकडे, सागरिकानं पत्रकार परिषदेत राज कुंद्रावर फेब्रुवारीमध्ये गंभीर आरोप केले होते. राज कुंद्राच्या अटकेनंतर बी सागरिका हॉटशॉट्स अॅपबद्दल उघडपणे बोलली. यानंतर सागरिकानं असा दावा केला होता की राज कुंद्रा विरोधात बोलल्यानंतर तिला मृत्यू आणि बलात्काराच्या धमक्या मिळू लागल्या आहेत. याबाबत सागरिकाने मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
सध्या राज कुंद्रा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांना 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती, त्यानंतर 23 जुलैपर्यंत त्याला रिमांडवर पाठवण्यात आलं होतं. पोलिसांनी राज कुंद्राला पुन्हा 23 जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता त्यानंतर कोर्टाने त्याचा रिमांड 27 जुलैपर्यंत वाढवला आहे. राज कुंद्राविरोधात पुरावे गोळा करण्यात पोलिस गुंतले आहेत, हे न्यायालयासमोर हजर केलं जाईल आणि त्यानंतर न्यायालय याप्रकरणी निर्णय देईल.
संबंधित बातम्या