मुंबई : राज कुंद्रा अश्लील चित्रपट प्रकरणात (Raj Kundra Case) मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला चौकशीत दररोज या प्रकरणासंदर्भात एक नवीन माहिती मिळत आहे. राज कुंद्राच्या कानपूर कनेक्शनची आणि सट्टेबाजीची माहिती समोर आल्यानंतर आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गुरुवारी राज कुंद्रा यांच्या कार्यालयात क्राईम ब्रांचने छापा मारला असता, त्यांना एक ‘गुप्त कपाट’ सापडले. आता या कपाटातून अश्लील चित्रपटाच्या स्क्रिप्ट्स व इतर कागदपत्रे सापडली आहेत, हे सिद्ध करत आहेत की राज कुंद्राला अटक झाल्यानंतरही त्यांची कंपनी शूटिंग सुरू ठेवणार होती.
या गुप्त कपाटातून अशाच एका अश्लील चित्रपटाची स्क्रिप्टही जप्त करण्यात आली आहे. कपाटमधून सापडलेल्या बहुतेक कागदपत्रांवर शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) सही आहे. अशा परिस्थितीत शिल्पा शेट्टीची पुन्हा एकदा या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राला अटक झाल्यानंतरही त्यांची कंपनी प्रौढ सामग्री तयार करण्याचा विचार करत होती. हिंदीतील अश्लील चित्रपटाची नवी स्क्रिप्ट कुंद्राच्या घराच्या सिक्रेट कपाटातून जप्त करण्यात आली आहे. ही स्क्रिप्ट रोमन आणि देवनागरी दोन्ही भाषेत लिहिली गेली आहे. अशी शक्यता आहे की, ही कंपनी अद्याप गुप्तपणे अशी सामग्री तयार करत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार शिल्पा शेट्टी आणि गेहना वशिष्ठ यांच्या हॉटशॉट आणि अन्य अॅप्सवर सामग्री अश्लील नसून कामुक असल्याचा दावा तपासण्यासाठी तज्ञांची मदत घेतली जात आहे. लवकरच हे देखील स्पष्ट होईल की, सामग्री कायद्यानुसार कोणत्या श्रेणी अंतर्गत आहे.
या तपासणीत असेही समोर आले आहे की, अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा सुरेंद्र शेट्टीसुद्धा सप्टेंबर 2020पर्यंत या कंपनीत संचालकपदावर होती. तपासादरम्यान अटक केलेल्या लोकांनी याची कबुली दिली आहे, याचा तपास केला जात आहे. शिल्पा शेट्टी काही महिन्यांपूर्वीपर्यंत तिचा नवरा कुंद्राच्या कंपनी जेएल स्ट्रीमची जाहिरात करत असल्याचे तपासात समोर आले आहे. ही अशी कंपनी आहे ज्यावर अश्लील सामग्री तयार केल्याचा आरोप आहे.
राज कुंद्रा यांच्या कार्यालयाच्या भिंतीमध्ये एक गुप्त कपाट लपवले आहे, असे वियान इंडस्ट्रीतील एका कर्मचाऱ्याने शनिवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला सांगितले. यानंतर पोर्नोग्राफी प्रकरणात नवीन छापा टाकण्यात आला आहे. छापा टाकल्यानंतर केलेल्या तपासात ते रहस्यमयी कपाट पोलिसांना सापडले आहे. छापा टाकल्यानंतर पोलिसांनी कपाट व काही बॉक्स ताब्यात घेतले आहेत. अश्लील चित्रपटांच्या या व्यवसायाशी संबंधित महत्त्वाचे पुरावे या कपाटातून सापडले आहेत.
गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या बॉक्समध्ये अशा काही फाइल्स सापडल्या आहेत, ज्यात आर्थिक व्यवहार आणि मुख्यत्वे क्रिप्टो चलनात गुंतवणूकीचे पुरावेही सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कुंद्राने पोलिसांना या लपवलेल्या कपाटाबद्दलही माहिती दिली नाही, त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीनच गडद झाला आहे. रहस्यमयी कपाटातून जप्त करण्यात आलेल्या क्रिप्टोकरन्सी कागदपत्रांवर तिची स्वाक्षरी असल्याने शिल्पा शेट्टीची या आठवड्यात पुन्हा चौकशी होऊ शकते.
(Raj Kundra Case crime branch found secret almirah in Raj Kundra Office)