मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्नाच्या (Rajesh Khanna) अभिनयाचं सर्वांनाच वेड आहे. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे ते सुपरस्टार झाले. एक काळ असा होता की राजेश खन्ना यांचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरायचा. 18 जुलै 2012 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्यासोबत काम केलेले कलाकार त्यांच्याशी संबंधित अनेक कथा सांगत असतात. आज राजेश खन्ना यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही तुम्हाला त्यांचा एक किस्सा सांगतोय. एकदा राजेश खन्ना स्वत:च्याच लुंगीमध्ये अडकून पडले होते.
अभिनेत्री शबाना आझमी यांनी एका मुलाखतीत राजेश खन्ना यांच्या या किस्स्याविषयी सांगितलं होतं. स्वत:च्याच लुंगीमध्ये अडकून पडल्यानंतर राजेश खन्ना यांना याबद्दल सेटवर सांगण्याची लाज वाटली होती, ज्यामुळे त्यांने घोड्यावरुन पडल्याचं खोटं सांगितलं होतं.
शबाना आझमी यांना केलं होतं शांत
शबाना आझमी आणि राजेश खन्ना यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. शबाना आझमी यांनी मुलाखतीत सांगितलं होतं की एकदा राजेश खन्ना पायात बॅन्डेड लावून सेटवर आले होते. काय झालं असं विचारलं असता ते म्हणाले की मी घोड्यावरून पडलो. हे ऐकून शबाना आझमी आश्चर्यचकित झाल्या आणि त्या म्हणाल्या पण काल तुम्ही माझ्याबरोबर शूट करत होतात आणि मला तुमच्यासोबत कोणताही घोडा दिसला नाही. शबाना आझमी पुढे म्हणाल्या- माझं बोलणं ऐकून काकाजी कुरकुर करायला लागले आणि मला शांत राहायला सांगितलं.
शबाना आझमी यांना नंतर खरं सांगितलं
शबाना आझमी यांनी सांगितलं की सगळे तिथून निघून गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की माझा पाय लुंगीमध्ये अडकला, ज्यामुळे मी पडलो होतो. हे सर्वांसमोर कसं सांगता आलं असतं.
वैष्णोदेवीमध्ये राजेशजी जमिनीवर झोपी गेले होते
शबाना आझमीनं या मुलाखतीत पुढं सांगितलं की, जेव्हा ते अवतार चित्रपटाच्या शूटिंगसाठी वैष्णो देवीमध्ये होते, तेव्हा त्यांनी जमिनीवर झोपायचा निर्णय घेतला होता. त्यांनी आपली घोंगडी बाजूला ठेवली होती आणि जमिनीवर झोपी गेले होते.
संंबंधित बातम्या
लव्हबर्ड्स कतरिना कैफ-विक्की कौशल लवकरच विवाह बंधनात अडकणार? सलमानच्या स्टायलिस्टने दिले संकेत!
Binge Watch : रोमँटिक-विनोदी चित्रपट पाहून कंटाळलायत? मग, ओटीटीवर या 5 फॅन्टसी सीरीज नक्की पाहा!