Income Tax: रजनीकांत, अक्षय कुमार भरतात सर्वाधिक टॅक्स; श्रीमंती पाहून तुमचेही डोळे विस्फारतील!

| Updated on: Jul 25, 2022 | 4:09 PM

रजनीकांत हे तामिळनाडूमध्ये सर्वाधिक आयकर (Income Tax) भरणारे कलाकार बनले आहेत. तर अक्षय कुमार हा बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कर भरणारा अभिनेता आहे. नुकतंच प्राप्तिकर दिनानिमित्त आयकर विभागाने या दोन्ही अभिनेत्यांचा गौरव केला आहे.

Income Tax: रजनीकांत, अक्षय कुमार भरतात सर्वाधिक टॅक्स; श्रीमंती पाहून तुमचेही डोळे विस्फारतील!
Income Tax: रजनीकांत, अक्षय कुमार भरतात सर्वाधिक टॅक्स
Image Credit source: Instagram
Follow us on

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) आणि बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या खूप चर्चेत आहेत. मात्र हे दोन्ही सुपरस्टार त्यांच्या कोणत्याही चित्रपटामुळे चर्चेत नाहीत. तर त्यांच्या श्रीमंतीमुळे चर्चेत आहेत. रजनीकांत हे तामिळनाडूमध्ये सर्वाधिक आयकर (Income Tax) भरणारे कलाकार बनले आहेत. तर अक्षय कुमार हा बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कर भरणारा अभिनेता आहे. नुकतंच प्राप्तिकर दिनानिमित्त आयकर विभागाने या दोन्ही अभिनेत्यांचा गौरव केला आहे. यानंतर त्यांच्या श्रीमंतीची चर्चा आहे. रजनीकांत आणि अक्षय कुमार यांची एकूण संपत्ती किती आहे ते एका चित्रपटासाठी किती मानधन घेतात याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना चाहते देवाचा दर्जा देतात. रजनीकांत यांच्याकडे आलिशान घरं आणि महागड्या गाड्या आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार, चेन्नईच्या पॉश गार्डनमध्ये रजनीकांत यांचं आलिशान घर आहे. त्याची किंमत सुमारे 35 कोटी रुपये इतकी आहे. तसंच अनेक लक्झरी एलिट गाड्यांसोबतच त्यांच्याकडे कस्टमाइज लिमोझिनसुद्धा आहे. जरी त्याची बाजारातील किंमत पाच ते सहा कोटी रुपये असली तरी रजनीकांत यांच्यासाठी कस्टमाईज केलेल्या गाडीची किंमत सुमारे 22 कोटी रुपये आहे. रजनीकांत यांच्याकडे सुमारे 17 कोटी रुपयांची रोल्स रॉयस फँटम कार आहे. त्याचप्रमाणे ‘राघवेंद्र मंडपम’ नावाचा विवाह हॉलसुद्धा आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याची किंमत 20 कोटी रुपयांपर्यंत आहे. सेलिब्रिटी नेटवर्थच्या मीडिया रिपोर्टनुसार, रजनीकांत यांची एकूण संपत्ती ही 365 कोटी रुपये इतकी आहे. रजनीकांत हे एका चित्रपटासाठी 55 कोटी रुपये मानधन घेतात.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

दुसरीकडे अभिनेता अक्षय कुमार बॉलिवूडमध्ये सर्वाधिक टॅक्स भरणारा अभिनेता बनला आहे. अक्षय सध्या इंग्लंडमध्ये त्याच्या पुढील चित्रपटाचं शूटिंग करत आहे. अक्षयच्या टीमने आयकर विभागाकडून मिळालेला पुरस्कार स्वीकारला आहे. अक्षय कुमार त्याच्या एका चित्रपटासाठी जवळपास 100 कोटी रुपये मानधन घेतो. चित्रपटांशिवाय अक्षयच्या उत्पन्नाचे इतरही स्रोत आहेत. त्याची एकूण संपत्ती 369 कोटी रुपये आहे. अक्षय कुमारची भारतातच नव्हे तर कॅनडामध्येही बरीच संपत्ती आहे. तो एका खाजगी जेटचाही मालक आहे, ज्याची किंमत सुमारे 260 कोटी रुपये आहे.

अक्षय सध्या इंग्लंडमध्ये असून जसवंत सिंग गिल यांच्या बायोपिकचं शूटिंग करत आहे. अक्षय कुमार लवकरच ‘रक्षा बंधन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे. ‘सेल्फी’, ‘राम सेतू’, ‘ओह माय गॉड 2’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हे चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सूर्याच्या ‘सूरराई पोट्रू’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही तो दिसणार आहे.