राम गोपाल वर्मा वादग्रस्त ट्विटमुळे ट्रोल, म्हणाले अभिनेत्रीच्या कुत्र्याकडूनच शिकलो…

| Updated on: Dec 11, 2022 | 7:01 PM

ही पोस्ट पाहून अनेकजण संताप व्यक्त करत आहेत.

राम गोपाल वर्मा वादग्रस्त ट्विटमुळे ट्रोल, म्हणाले अभिनेत्रीच्या कुत्र्याकडूनच शिकलो...
Follow us on

मुंबई : गेल्या आठ दिवसांपासून राम गोपाल वर्मा प्रचंड चर्चेत आले आहेत. चित्रपटाचे प्रमोशन करण्याच्या नादामध्ये त्यांनी असे काही केले की, त्यांच्यावर टीका केली जातंय. आता राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर अजून एक पोस्ट केलीये. ही पोस्ट पाहून अनेकजण संताप व्यक्त करत आहेत. राम गोपाल वर्मा यांचा डेंजरस हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अनेक बोल्ड सीन्स दाखवण्यात आले आहेत. डेंजरस हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होणार होता. मात्र, वादामुळे चित्रपटाची डेट पुढे ढकलण्यात आली होती.

नुकताच राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये त्यांनी दोन फोटोही शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीच्या वेळी त्यांनी अभिनेत्री आशू रेड्डी हिच्या पायाची किस घेतली होती.

आता त्याचसंदर्भात त्यांनी ही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीये. आशू रेड्डीच्या पायाजवळ मला जाणवलेली डेंजरस भावना. ते मी अप्सरा राणीच्या कुत्र्याकडून शिकलो. आता हेच ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यावरून अनेकांनी परत एकदा राम गोपाल वर्मा यांना ट्रोल केले आहे.

राम गोपाल वर्मा त्यांच्या आगामी डेंजरस या चित्रपटाचे प्रमोशन करण्याच्या नादामध्ये चर्चेत आले आहेत. लाईव्ह मुलाखतीमध्ये त्यांनी आशू रेड्डी हिच्या पायाचा काही वेळ मसाज केला आणि नंतर थेट पायाची किस केली.

विशेष म्हणजे राम गोपाल वर्मा यांचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी राम गोपाल वर्मा यांना ट्रोल देखील केले. इतकेच नाहीतर ही आशू रेड्डी ही तुमच्या मुलीच्या वयाची असल्याचे देखील अनेकांनी म्हटले होते.