मुंबई : बाहुबली चित्रपटातील भल्लालदेवच्या भूमिकेमुळे एक वेगळी ओळख मिळवलेला अभिनेता अर्थात राणा दग्गुबाती नेहमीच चर्चेत असतो. राणा दग्गुबातीने आतापर्यंत दाक्षिणात्य चित्रपटांसह बाॅलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राणा दग्गुबाती आणि त्याची पत्नी मिहिका बजाज चर्चेत आले आहेत. एक चर्चा होती की, राणा दग्गुबाती लवकरच बाप होणार आहे. याविषयी चाहते सातत्याने राणाला प्रश्न विचारत होते.
एका कार्यक्रमामध्ये अॅंकरने थेट राणा दग्गुबाती याला शुभेच्छा दिल्या आणि कोणत्या महिन्यात मिहिका बजाज बाळाला जन्म देणार हा प्रश्न विचारून टाकला. हा प्रश्न विचारल्यानंतर काही वेळ राणा दग्गुबाती शांत बसला.
यावर बोलताना राणा दग्गुबाती हसत म्हणाला की, गेल्या काही दिवसांपासून मिहिकाच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या सातत्याने येत आहेत, आम्ही यावर बोलणे अगोदर टाळले. परंतू हे आता लोकांना खरे वाटू लागले आहे.
इतकेच नाही तर आता या कार्यक्रमामध्ये मला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पुढे राणा म्हणाला की, या सर्व फक्त अफवा आहेत, असे अजिबातच काहीही नाहीये आणि मी बाप होणार असेल तर मला माहिती नसणार का?
काही दिवसांपूर्वी राणा दग्गुबाती याने पत्नीसोबतचे काही फोटो हे सोशल मीडियावरून डिलीट केले होते. इतकेच नाही तर प्रोफाईल फोटोही राणा दग्गुबातीने बदला होता, यामुळे अनेक चर्चांना त्यावेळी उधाण आले होते.
राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाज घटस्फोट घेणार असल्याच्या देखील चर्चा सुरू होत्या. मात्र, त्यांनी परत एक फोटो शेअर करून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता. आणि मिहिका बजाजच्या प्रेग्नेंसीबद्दल सतत बातम्या येत आहेत.