मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा त्याच्या तू झूठी मैं मक्कार या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. रणबीर कपूर याने तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन केले. हा चित्रपट आज रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहे. रिपोर्टनुसार या चित्रपटाची ओपनिंग धमाकेदार होणार असल्याचे सांगितले जात आहे. तू झूठी मैं मक्कार (Tu Jhoothi Main Makkaar) या चित्रपटामध्ये रणबीर कपूर याच्यासोबत बाॅलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांनी सोबत स्क्रीन शेअर केलीये.
श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांची जोडी बाॅक्स आॅफिसवर धमाका करेल असे सांगितले जात आहे. तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाचे प्रमोशन करत असताना रणबीर कपूर याने त्याच्या पर्सनल लाईफमधील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. इतकेच नाहीतर त्याने मुलगी राहा हिच्याबद्दलची देखील काही माहिती शेअर केलीये.
नुकताच रणबीर कपूर याने लग्नाबद्दल बोलताना मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी लोकांना हसवताना रणबीर कपूर हा दिसला. रणबीर कपूर म्हणाला की, मी गेल्या वर्षी आलिया हिच्यासोबत लग्न केले होते. मग तो त्याच्या बोलण्यावर शंका घेतो आणि कुणाला तरी विचारतो की गेल्या वर्षीच, नाही का? असे म्हणत रणबीर कपूर हसताना दिसतो. यावेळी रणबीर कपूर हा आपल्या वडिलांची देखील आठवण काढताना दिसला.
तू झूठी मैं मक्कार चित्रपटाच्या प्रमोशनवेळी रणबीर कपूर याला आलिया आणि मुलगी राहा यांची देखील आठवण आली. रणबीर कपूर म्हणाला होता की, मला आलिया आणि राहा यांची खूप आठवण येत आहे. या दोघी सध्या मुंबईमध्ये नसून काश्मीर येथे गेल्या आहेत. आलिया हिच्या चित्रपटाची शूटिंग काश्मीर येथे सुरू असून तिच्यासोबत राहा देखील गेलीये.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रणबीर कपूर म्हणाला होता की, मी कधी कधी विचार करतो की, या सर्व गोष्टी करायचा मी इतका जास्त उशीरा का केला. आलिया भट्ट हिने नोव्हेंबरमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आलिया आणि रणबीर यांनी आपल्या मुलीचा नाव राहा असे ठेवले आहे. मात्र, अजूनही आलिया आणि रणबीर कपूर यांनी आपल्या मुलीची झलक चाहत्यांना दाखवली नाहीये.