रणबीर कपूर याने आलिया भट्ट हिला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिले इतक्या लाखांचे गिफ्ट, चाहते हैराण

| Updated on: Apr 17, 2023 | 9:11 PM

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे कायमच चर्चेत असतात. 14 एप्रिल रोजी यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या.

रणबीर कपूर याने आलिया भट्ट हिला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिले इतक्या लाखांचे गिफ्ट, चाहते हैराण
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस 14 एप्रिल रोजी झालाय. आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर करत लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा या रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याला दिल्या. 14 एप्रिल 2022 रोजी आलिया आणि रणबीर कपूर यांनी लग्न गाठ बांधली. आलिया भट्ट हिने 6 नोव्हेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म देखील दिलीय. आलिया भट्ट हिने काही खास फोटो (Photo) शेअर करत आपल्या मुलीच्या नावाच अर्थही सांगून टाकला. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा असे ठेवले आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या मुलीची झलक चाहत्यांना अजून दाखवली नाहीये.

रणबीर कपूर हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर याचा तू झुठी में मक्कार हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळालाय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही रणबीर कपूर हा दिसला. आलिया भट्ट ही काश्मीर येथे तिच्या आगामी चित्रपटाची शूटिंग करत होती.

रणबीर कपूर हा नुकताच लंडन येथून परत भारतामध्ये दाखल झालाय. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त लंडनवरून पत्नी आलिया हिच्यासाठी एक खास गिफ्ट रणबीर कपूर हा लंडन येथून घेऊन आलाय. विमानतळामधून बाहेर पडतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर रणबीर कपूर याचा तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये एक बॅग रणबीर कपूर याच्या हातामध्ये दिसत आहे. या बॅगमध्येच आलिया भट्ट हिचे गिफ्ट आहे. विशेष म्हणजे रणबीर कपूर याने आणलेले हे गिफ्ट काही साधारण नसून अत्यंत महागडे हे गिफ्ट आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे नुकताच त्यांच्या घराचे काम पाहण्यासाठी गेले होते. यावेळी आलिया भट्ट हिच्या हातामध्ये एक बॅग दिसत आहे.

ही हँड बॅग रणबीर कपूर याने लंडनवरून आणल्याचा अंदाज चाहते लावताना दिसत आहेत. कारण रणबीर कपूर विमानतळामधून बाहेर पडत असताना त्याच्या हातामध्ये असलेल्या बॅगमध्ये अशीच  हँड बॅग दिसत असल्याची चर्चा आहे. आलिया भट्ट हिच्या हातामध्ये जी  हँड बॅग दिसत आहे. ती अत्यंत खास हँड बॅग असून या हँड बॅगची किंमत ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसले. रणबीर कपूर याने आलिया भट्ट हिला गिफ्ट दिलेल्या हँड बॅगची किंमत ही तब्बल 10 लाख रूपये आहे.