मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याचा तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. विशेष म्हणजे रणबीर कपूर याच्या या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर देखील चांगलीच धमाल केलीये. रणबीर कपूर या चित्रपटाचे जोरदार प्रमोशनही करताना दिसला. चित्रपटाच्या (Movie) प्रमोशनच्या कार्यक्रमात रणबीर कपूर याने आपल्या पर्सनल लाईफबद्दल देखील चाहत्यांना माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट हिने एका गोंडल मुलीला जन्म दिलाय. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा असे ठेवले असून चाहते यांच्या मुलीला बघण्यास उत्सुक आहेत. मात्र, अद्याप रणबीर कपूर किंवा आलिया भट्ट यांनी त्यांच्या मुलीची झलक ही चाहत्यांना दाखवली नाहीये.
असे बरेच बाॅलिवूड स्टार आहेत, जे कायमच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात सोशल मीडियाच्या माध्यमातून राहतात. इतकेच नाही तर आपल्या आयुष्यात काय सुरू आहे हे देखील सांगतात. अनेक स्टार आपल्या फिटनेस आणि डाएटबद्दल देखील चाहत्यांना सांगताना दिसतात. मात्र, रणबीर कपूर हा कायमच सोशल मीडियावर लांब असतो.
काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर याने एका मुलाखतीमध्ये सोशल मीडियापासून दूर राहण्याचे कारण सांगितले आहे. रणबीर कपूर म्हणाला की, मला वाटते की, माझे चाहते माझ्या चित्रपटाच्या माध्यमातून माझ्या संपर्कात राहिले पाहिजेत. मी सतत चित्रपट करून त्यांचे मनोरंजन करायला हवे. इतकेच नाही तर माझी पर्सनल लाईफ ही कायमच पर्सनल राहिला हवी असेही मला वाटते.
पुढे रणबीर म्हणाला की, एकदा कलाकार सोशल मीडियावर आला की, त्यांना स्वतःला एका विशिष्ट पद्धतीने सादर करावे लागते. बऱ्याच वर्षांनंतर सोशल मीडियावर सक्रिय राहत नसल्याचे कारण सांगताना रणबीर कपूर हा दिसला आहे. विशेष म्हणजे तू झूठी मैं मक्कार चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रणबीर कपूर हा श्रद्धा कपूर हिच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसला.
श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांच्या जोडीला प्रेक्षकांचे चांगले प्रेम मिळाले. तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाने धमाकेदार कामगिरी बाॅक्स आॅफिसवर केलीये. तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाचे फक्त रणबीर कपूर हाच नाही तर श्रद्धा कपूर देखील जोरदार प्रमोशन करताना दिसली होती. परत रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर हे स्क्रीन शेअर करताना दिसू शकतात.