मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा त्याच्या तू झूठी मैं मक्कार (Tu Jhoothi Main Makkaar) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रणबीर कपूर याचा हा चित्रपट 8 मार्च रोजी रिलीज झाला. रणबीर कपूर याच्या चित्रपटानंतर राणी मुखर्जी हिचा मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे आणि कपिल शर्मा याचा ज्विगाटो हे चित्रपट (Movie) रिलीज झाले. अशी एक चर्चा होती की, राणी मुखर्जी आणि कपिल शर्मा यांच्या चित्रपटामुळे रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्या तू झूठी मैं मक्कार चित्रपटाचे बाॅक्स आॅफिसवर कलेक्शन कमी होईल. मात्र, प्रत्यक्षात असे काही घडले नाही आणि तू झूठी मैं मक्कार चित्रपटाची अजूनही बाॅक्स आॅफिसवर धमाकेदार कामगिरी बघायला मिळत आहे.
शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटानंतर अक्षय कुमार याचा सेल्फी आणि कार्तिक आर्यन याचा शहजादा हे चित्रपट रिलीज झाले. मात्र, या दोन्ही चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यात अजिबात यश मिळाले नाही. या दोन्ही चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्या. पठाण चित्रपटानंतर बाॅलिवूडला चांगले दिवस आल्याचे बोलले जात होते. मात्र, याला अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन यांचे चित्रपट अपवाद ठरले.
अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटानंतर रणबीर कपूर याचा तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे रणबीर कपूर याचा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाने आतापर्यंत जगभरातून 178.4 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले आहे.
राणी मुखर्जी हिने मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच दिवसांनंतर बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले. रिलीजच्या अगोदर मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे चित्रपटाची जोरदार चर्चा होती. मात्र, काही खास धमाका करण्यात राणी मुखर्जी हिच्या चित्रपटाला यश मिळाले नाही. मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनमध्ये सतत चढउतार बघायला मिळत आहेत.
राणी मुखर्जी हिच्या चित्रपटासोबतच कपिल शर्मा याचा ज्विगाटो हा चित्रपट रिलीज झाला. कपिल शर्मा या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी कपिल शर्मा याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल काही मोठे खुलासे देखील केले. ज्विगाटो या चित्रपटात कपिल शर्मा हा डिलीवरी बाॅयच्या भूमिकेत आहे. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाल करण्यात यश मिळाले नाहीये. हा चित्रपट फ्लाॅप जाण्याच्या मार्गावर आहे.