रणबीर कपूर याचा जलवा कायम, तिसऱ्या दिवशी तू झूठी मैं मक्कार चित्रपटाने केले तब्बल इतक्या कोटींचे कलेक्शन

| Updated on: Mar 11, 2023 | 3:42 PM

रणबीर कपूर याचा चित्रपट तू झूठी मैं मक्कार धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे चांगले प्रेम मिळत आहे. रणबीर कपूर याच्यासोबत श्रद्धा कपूर ही देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

रणबीर कपूर याचा जलवा कायम, तिसऱ्या दिवशी तू झूठी मैं मक्कार चित्रपटाने केले तब्बल इतक्या कोटींचे कलेक्शन
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या तू झूठी मैं मक्कार (Tu Jhoothi Main Makkaar) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई करण्यास सुरूवात केलीये. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शाहरूख खान (Shah Rukh Khan) याच्या पठाण चित्रपटाने देखील बाॅक्स आॅफिसवर सुसाट अशी कामगिरी केलीये. मात्र, पठाण या चित्रपटानंतर अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा सेल्फी आणि कार्तिक आर्यन याचा शहजादा हे चित्रपट फ्लाॅप गेले. यामुळे रणबीर कपूर याच्या तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाचे काय होणार हा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, या चित्रपटाने चांगली सुरूवात केलीये.

तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाचे प्रमोशन करताना रणबीर कपूर हा दिसला. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी रणबीर कपूर याने मोठे खुलासे देखील केले. यावेळी रणबीर कपूर हा मुलगी राहा हिच्याबद्दल सांगताना देखील दिसला. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट सतत बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. मात्र, याला आता याला रणबीर कपूर याचा तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट अपवाद ठरला आहे.

रणबीर कपूर याचा तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट 8 मार्च रोजी रिलीज झालाय. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर याच्यासोबत श्रद्धा कपूर ही देखीस मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर हे पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसले. विशेष म्हणजे यांची जोडी प्रेक्षकांनाही प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. या जोडीने बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यास सुरूवात केलीये.

तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाने पहिल्या दिवशी बाॅक्स आॅफिसवर 15.73 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 10.34 कोटींची कमाई केली. आता चित्रपटाच्या तिसऱ्या दिवशीचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन पुढे आले आहे. तरण आदर्श यांनी एक पोस्ट शेअर करत चित्रपटाचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन सांगितले आहे.

तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 10.52 कोटींचे कलेक्शन केले आहे. आता चित्रपटाचे एकून बाॅक्स आॅफिस कलेक्शन हे 36.59 कोटी झाले आहे. रणबीर कपूर याच्या तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाला चाहत्यांचे प्रेम मिळताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत होते. रणबीर कपूर याचा चित्रपट धमाकेदार कामगिरी करत आहे.