मुंबई : बॉलिवूडची बहुचर्चित जोडी अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) यांनी नुकतीच महागडी शॉपिंग केली आहे. रणवीर आणि दीपिकाने मुंबईपासून जवळच असलेल्या अलिबागमध्ये तब्बल 90 गुंठे जागा खरेदी केली आहे. अलिबागमधील मापगाव या भागात त्यांनी ही जागा जवळपास 22 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे. या जगेच्यक़ रजिस्ट्रेशनसाठी या जोडीने नुकतीच अलिबागच्या रजिस्ट्रार कार्यालयात हजेरी लावली होती.
दीपिका आणि रणवीरने आलिबागमध्ये खरेदी केलेल्या या जागेत दोन आलिशान बंगले असून, नारळ आणि सुपारीच्या तयार बागा देखील आहेत. या जागेच्या नोंदणीसाठी रणवीर आणि दीपिकाने नुकतीच अलिबागमध्ये हजेरी लावली होती. यावेली आपल्या लाडक्या जोडीची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते जमा झाले होते.
[Video] Deepika Padukone and Ranveer Singh spotted at Alibaug register office pic.twitter.com/yvFk9COrbH
— Deepika Padukone FC (@DeepikaPFC) September 13, 2021
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंहची (Ranveer Singh) जोडी चाहत्यांमध्ये खूप पसंत केली जात आहे. रणवीर आणि दीपिका हे बॉलिवूडमधील सर्वोत्तम जोडप्यांपैकी एक मानले जातात. हे पती-पत्नी नेहमीच एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी एकमेकांना बराच काळ डेट केल्यानंतर लग्न केलं.
दीपिकाने 2018 मध्ये इटलीच्या मोकामा लेक येथे बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्न केले. रणवीर अनेक वेळा माध्यमांच्या समोर, स्क्रीनवर दीपिकावरील त्याचं प्रेम व्यक्त करताना दिसला आहे. राजस्थानमधील रणथंभोर पॅलेसमध्ये दीपिका आणि रणवीरने नवीन वर्षाचे स्वागत केले. दीपवीरची ही जोडी बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लाडक्या जोडप्यांमध्ये मोजली जाते.
रणवीर आणि दीपिकाने ‘रामलीला’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. रामलीलाच्या सेटवर रणवीर आणि दीपिकाची जवळीक वाढली होती. दोघांनी रामलीलाच्या सेटवरच एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. या चित्रपटात दोघांमधील जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. त्यानंतर दोघांच्या लिंकअपची बातमी पुढे येऊ लागली.
रणवीरने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, दीपिकाला सहा महिने डेट केल्यानंतरच तिला लग्नाबाबत विचारलं होतं. रणवीर म्हणाला की, दीपिकाला लिली (Lily Flower) खूप आवडते. दीपिकासाठी फुले खरेदी करण्यासाठी माझे खूप पैसे खर्च झाले आहेत. दीपिकापेक्षा चांगली जोडीदार मला मिळाली नसती. दीपिकामुळेच माझं करिअर इतकं यशस्वी झालं आहे.
रणवीरने एका मुलाखतीत सांगितले होते की, अनेक वर्षे डेट करुनही दीपिकाला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे नव्हते. कारण दीपिकाला नेहमीच परंपरा पाळायची होती. तिचा लग्नावर विश्वास होता आणि आहे. म्हणून ती कधीही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला तयार नव्हती.
TMKOC | ‘बबिता जी’ फेम मुनमुन दत्तासोबत रिलेशनशिपची चर्चा, पाहा काय म्हणाला ‘टप्पू’?
‘चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले…’, खास कॅप्शनसह संस्कृती बालगुडेने शेअर केले सुंदर फोटो!