मुंबई : साऊथ आणि आता बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. साऊथनंतर रश्मिकाने आता बॉलिवूडमध्ये देखील एंट्री केलीये. नुकताच रश्मिका आणि अमिताभ बच्चन यांचा गुड बाय हा चित्रपट (Movie) प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. विशेष म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील करतोय. रश्मिकाची फॅन फाॅलोइंग सातत्याने वाढत आहे. सलमान खान आणि गोविंदासोबत रश्मिकाने सामी सामी गाण्यावर डान्सही केला. ज्याचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता.
नुकताच रश्मिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टसोबतच रश्मिकाने तिचा एक फोटोही शेअर केलाय. या फोटोमध्ये रश्मिकाचा एकदम कूल लूक दिसतोय. गुड बाय चित्रपट रिलीज झाल्यानंतर रश्मिका सुट्टया घालवण्यासाठी मालदीवमध्ये पोहचली होती. मालदीवमधील काही खास फोटो यापूर्वी रश्मिकाने आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले होते. रश्मिका कायमच चाहत्यांसाठी ग्लॅमरस फोटो शेअर करते.
रश्मिका मंदानाने जो फोटो शेअर केलाय त्यासोबत तिने लिहिले की, गुड बाय…रश्मिकाचा हा फोटो मालदीवमधील दिसतोय. रश्मिका मालदीवला बॉयफ्रेंड विजय देवरकोंडासोबत गेल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र, यावर रश्मिका किंवा विजयने कोणतेच भाष्य केले नाहीये. मात्र, रश्मिकाने शेअर केलेला फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडलांय. रश्मिकाची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतंय.