पहिल्या आठवड्यात हा चित्रपट 6 कोटींचीही कमाई (Box Office Collection) करू शकणार नाही, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. इतकंच नव्हे तर एका आठवड्यानंतर हा चित्रपट सिंगल स्क्रीनवरून हटवला जाईल आणि त्याची जागा 'खुदा हाफिज 2' घेईल, असंही म्हटलं जात आहे.
Movies
Image Credit source: Twitter
Follow us on
आदित्य रॉय कपूरची (Aditya Roy Kapoor) मुख्य भूमिका असलेला ‘राष्ट्रकवच: ओम’ (Rashtra Kavach Om) हा ॲक्शनपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला आहे. रिलीजच्या चौथ्या दिवशी चित्रपचाची कमाई सुमारे 55 टक्क्यांनी कमी झाली आहे. सोमवारी या चित्रपटाने केवळ 60 लाखांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई केवळ 4.75 कोटी रुपये इतकी आहे. पहिल्या आठवड्यात हा चित्रपट 6 कोटींचीही कमाई (Box Office Collection) करू शकणार नाही, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. इतकंच नव्हे तर एका आठवड्यानंतर हा चित्रपट सिंगल स्क्रीनवरून हटवला जाईल आणि त्याची जागा ‘खुदा हाफिज 2’ घेईल, असंही म्हटलं जात आहे.
‘राष्ट्रकवच: ओम’ची कमाई-
#RashtraKavachOm struggles on Day 2… Dips at national chains, but performs better in mass pockets… The 2-day total, however, is extremely low… Fri 1.51 cr, Sat 1.70 cr. Total: ₹ 3.21 cr. #India biz. pic.twitter.com/keHy33NkCj
शुक्रवार- 1.35 कोटी रुपये
शनिवार- 1.25 कोटी रुपये
रविवार- 1.50 कोटी रुपये
सोमवार- 60 लाख रुपये
एकूण- 4.70 कोटी रुपये
‘रॉकेटरी’ची अवस्थाही वाईट
आर. माधवनची मुख्य भूमिका असलेल्या ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’च्या हिंदी व्हर्जननेही रिलीजच्या चौथ्या दिवशी केवळ 60 लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत केवळ 4.50 कोटींचाच माफक गल्ला जमवला आहे. पहिल्या आठवड्यात हा चित्रपट जवळपास 6.25 कोटींची कमाई करू शकेल, असा अंदाज आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तमिळनाडूमध्येही या चित्रपटाची कामगिरी खूपच निराशाजनक आहे.
‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ची कमाई-
शुक्रवार- 65 लाख रुपये
शनिवार- 1.30 कोटी रुपये
रविवार- 1.90 कोटी रुपये
सोमवार- 60 लाख रुपये
एकूण- 4.45 कोटी रुपये
जुग जुग जियोच्या कमाईतही घसरण
वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने ‘रॉकेटरी’ आणि ‘राष्ट्रकवच: ओम’ या चित्रपटांपेक्षा थोडा चांगला व्यवसाय केला. सोमवारी या चित्रपटाने केवळ 1.75 कोटींची कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाने 65 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट 20 कोटींपर्यंत कमाई करेल असा अंदाज आहे.
जुग जुग जियोची कमाई-
#JugJuggJeeyo puts up a good show in Weekend 2… National chains attract ample footfalls… Faces a mighty #Hollywood opponent [#Thor] on Thu, has time till Wed to score… [Week 2] Fri 3.03 cr, Sat 4.75 cr, Sun 6.10 cr. Total: ₹ 67.54 cr. #India biz. pic.twitter.com/ZqVVO8v1Ml
पहिला आठवडा – 50.17 कोटी रुपये
शुक्रवार – 2.75 कोटी रुपये
शनिवार – 4.75 कोटी रुपये
रविवार – 5.75 कोटी रुपये
सोमवार – 1.75 कोटी रुपये
एकूण- 65.17 कोटी रुपये