मुंबई : ड्रग्ज प्रकरणात अटक आणि जामिनानंतर शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) लाडका लेक आर्यन खान (Aryan Khan) खूप चर्चेत आला आहे. या ड्रग्ज प्रकरणामुळे शाहरुखच्या कामावर देखील मोठा परिणाम झाला होता. मुलाच्या काळजीत किंग खानने त्याचे सगळे आगामी प्रोजेक्ट लांबणीवर टाकले होते. मात्र, आता आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख पुन्हा एकदा कामावर परतला आहे. मात्र, शुटींगला रवाना होण्यापूर्वी त्याने आर्यनची जबाबदारी गौरीवर न सोपवता एका खास विश्वासू व्यक्तीवर सोपवली आहे.
‘पठाण’च्या शुटींगवर जाण्यापूर्वी शाहरुख खानने मोठा निर्णय घेतला आहे. शाहरूख खानने त्याचा बॉडीगार्ड रवी सिंहवर (Ravi Singh) आर्यन खानच्या सुरक्षेची जबाबदारी टाकली आहे. शाहरुखच्या अनुपस्थितीत रवी सिंह आर्यनची काळजी घेणार आहे. मात्र, आपला सर्वात जवळचा आणि विश्वासू माणूस आर्यनसाठी मागे ठेवल्यानंतर शाहरुख आता स्वत:साठी नवीन बॉडीगार्ड शोधणार आहे.
कुटुंबातील एका जवळच्या सूत्राने दिलेल्या माहीतीनुसार, आर्यन खानच्या बाबतीत कुणावरही आता विश्वास नसल्याने शाहरुख खानने त्याची जबाबदारी रवी सिंहवर टाकली आहे. अनेक वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखतात आणि दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. आर्यनला तुरुंगातून बाहेर आल्यानंतर घरी आणण्यासाठी देखील रवी सिंहच गेला होता.
रवी सिंह गेल्या दहा वर्षांपासून शाहरुख खानसोबत अंगरक्षक म्हणून आहे. शाहरुख खानचा बॉडीगार्ड असल्याने तो नेहमीच त्याच्या सावलीसारखा असतो. 13 ऑक्टोबरला शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी मुंबई सत्र न्यायालयात आली तेव्हाही रवी सिंह तिच्यासोबत होता.
शाहरुख खानचा सर्वात विश्वासू असण्याव्यतिरिक्त, रवी सिंह हा बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अंगरक्षकांपैकी एक मानला जातो. काही दिवसांपूर्वी शाहरुख खान रवी सिंहला महिन्याला 2 कोटी 7 लाख रुपये पगार देतो, अशी देखील चर्चा होती.
रवी सिंह हा शाहरुख खानचा सुरक्षा प्रमुख आहे. शाहरुखसोबतच त्याच्या कुटुंबाच्या रक्षणाची जबाबदारीही त्याच्यावर आहे. रवी सिंहची टीम आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खान यांच्या सुरक्षेचीही काळजी घेते. शाहरुख खानचे दररोजचे टाईम टेबल रवी सिंहसोबत असते. रवी नेहमीच शाहरुखसोबत त्याच्या सावलीसारखा उभा असतो.
क्रुझ ड्रग्ज प्रकरणी आर्यनला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात जावे लागणार आहे आणि एजन्सी आर्यन खानला पुढील समन्स बजावून बोलावण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शाहरुख खानला वाटतंय की, त्याच्या अनुपस्थितीत रवी हाच विश्वासू व्यक्तीची भुमिका बजावेल.