मुंबई : 2023 मध्ये शाहरुख खान याचा पठाण चित्रपट रिलीज होणार आहे. मात्र, आताच हा चित्रपट चर्चेत आलाय. शाहरुख खान हा पठाणच्या माध्यमातून तब्बल 4 वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय. विशेष म्हणजे शाहरुखचे तब्बल तीन चित्रपट 2023 मध्येच प्रेक्षकांच्या भेटीला येतील. पठाण हा चित्रपट बिग बजेटचा असून या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये फक्त शाहरुख खानच नाहीतर सलमान खान हा देखील दिसणार आहे. पठाण चित्रपटामध्ये सलमान खानचा कॅमिओ आहे.
सलमान खान याचे देखील 2023 मध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सर्वात अगोदर सलमान याची झलक पठाण चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे.
पठाण चित्रपटाची वाट शाहरुख खानच्या चाहत्यांसोबतच आता सलमान खान याचे चाहते देखील पाहात आहेत. या चित्रपटामध्ये स्टारर्सने मोठी तगडी फी घेतली आहे. एकट्या शाहरुख खान यानेच पठाण चित्रपटासाठी 100 कोटी घेतले आहेत.
आता सोशल मीडियावर ही चर्चा रंगताना दिसत आहे की, सलमान खान याने पठाण चित्रपटातील कॅमिओसाठी नेमके किती कोटी घेतले आहेत? परंतू या कॅमिओसाठी सलमान खान याने काहीच फी घेतलीये नाहीये. हा कॅमिओ सलमान खान याने फ्री केला आहे.
शाहरुख खानसोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण ही देखील चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहे. दीपिका हिने या चित्रपटासाठी 15 कोटी घेतले असून जॉन इब्राहम याने 20 कोटी फी घेतली आहे.