मुंबई : बॉलिवूडमधील असा एक किस्सा जो यापूर्वी तुम्ही कदाचित कधीच ऐकला नसावा. एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये श्रीदेवी यांनी गाजवला आहे. अनेक हीट चित्रपट श्रीदेवी यांनी बाॅलिवूडला दिले आहेत. आजही श्रीदेवी यांचा चाहता वर्ग मोठा आहे. साऊथपासून बाॅलिवूडपर्यंत रजनीकांत यांनी देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप सोडली आहे. साऊथमध्ये रजनीकांत यांना देवाप्रमाणे चाहते मानतात. आजही रजनीकांत यांचा चाहता वर्ग मोठा आहे. श्रीदेवी जरी आज आपल्यामध्ये नसल्यातरीही त्यांचा एक किस्सा खूप जास्त प्रसिध्द आहे. तुम्हाला सर्वांना जाणून आश्चर्य नक्कीच वाटेल. परंतू श्रीदेवी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी आई झाली होती. हे ऐकून बसला ना धक्का? होय हे खरे आहे…पण हे एका चित्रपटामध्ये घडले होते.
श्रीदेवी यांनी त्यांच्या बाॅलिवूड करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट केले आहेत. श्रीदेवी यांनी अत्यंत कमी वयामध्ये काम करण्यास सुरूवात केली होती. लहान वयामध्येच श्रीदेवी यांचा अभिनय पाहून अनेकांनी अंदाजा लावला होता की, मोठेपणी ही एक प्रसिध्द अभिनेत्री नक्कीच बनेल.
1960 मध्ये रिलीज झालेला चित्रपट मंदरू मुदिचू यामध्ये श्रीदेवी १३ वर्षाची असताना आईच्या भूमिकेत होती. विशेष बाब म्हणजे चक्क रजनीकांत यांच्या सावत्र आईची भूमिका श्रीदेवी यांनी मंदरू मुदिचू या चित्रपटामध्ये निभावली होती.
मंदरू मुदिचू या चित्रपटामध्ये वय कमी असताना देखील श्रीदेवी यांनी एका वयस्कर महिलेची भूमिका उत्तम प्रकारे साकारली. यामधील महत्वाचा किस्सा म्हणजे रजनीकांत हे श्रीदेवी यांच्यापेक्षा तब्बल १२ वर्षांनी मोठे असताना देखील ही भूमिका अतिशय उत्तम प्रकारे श्रीदेवीने निभावली होती.
या चित्रपटाच्या वेळी श्रीदेवी १३ वर्षांच्या आणि रजनीकांत हे २५ वर्षांचे होते. रजनीकांत यांच्यापेक्षा श्रीदेवी यांनी या चित्रपटासाठी मोठी रक्कम घेतली होती. या चित्रपटामुळे रजनीकांत आणि श्रीदेवी यांच्यामध्ये चांगली मैत्री देखील झाली.
या चित्रपटामध्ये असे दाखवण्यात आले आहे की, रजनीकांत यांना श्रीदेवी आवडत होत्या. मात्र, चित्रपटात असा ट्विस्ट येतो की, रजनीकांत यांच्या वडिलांना श्रीदेवीशी लग्न करावे लागते. या चित्रपटाच्या वेळी रजनीकांत यांची तब्येत खराब झाली होती. त्यावेळी श्रीदेवी यांनी व्रत ठेवले होते.